Friday, 28 August 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
प्रश्नावली
१)            प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य हेतू काय आहे?
उत्तर  : प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती सर्वाना व्हावी. शिक्षकांना मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत करणे हा मुख्य हेतू आहे.
२)   प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत वर्षभरात किती चाचण्या घेण्यात येणार आहेत?
उत्तर  : तीन
३)             चाचण्या कोणत्या प्रकारच्या असतील?
उत्तर  : पायाभूत चाचणी ,संकलित चाचणी १ व संकलित चाचणी २
४)            या चाचण्या कोणत्या कालावधीत होतील?
उत्तर  : पायाभूत चाचणी माहे सप्टेंबर २०१५  , संकलित १ माहे नोव्हेंबर २०१५ आणि संकलित २ माहे एप्रिल २०१६
५)            पायाभूत चाचणी  कोणत्या क्षमतांवर आधारीत राहील?
उत्तर  : पायाभूत चाचणी मागील इयत्तेपर्यंतच्या मुलभूत क्षमता व त्या त्या इयत्तेच्या प्रमुख क्षमता
६)            संकलित मूल्यमापन १ चाचणी कोणत्या क्षमतांवर आधारित असेल?
उत्तर  : संकलित मूल्यमापन १ सत्रांत चाचणी ही मागील इयत्तेपर्यंतच्या मुलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राखेर पर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्न या चाचणीमध्ये असतील.
७)            संकलित मूल्यमापन २ चाचणी कोणत्या क्षमतांवर आधारित असेल?
उत्तर  : संकलित मूल्यमापन २  सत्रांत चाचणी मुलभूत क्षमता,पहिल्या आणि दुसऱ्या सत्राखेर पर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्न या चाचणीमध्ये असतील.
८)            चाचणी आयोजनात लेखी चाचणीसाठी किती वेळ लागेल?
उत्तर  : चाचणीसाठी वेळेचे बंधन नाही. संपूर्ण दिवसभरात मुलांच्या गतीने चाचणी घेण्यात येईल.
९)            या चाचण्या किती गुणांची असतील?
उत्तर  :  चाचण्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील  भारांशानुसार असतील.
१०)       चाचण्यांचे इयत्तानिहाय गुणांकन कसे राहील?
उत्तर  : इयत्ता पहिली व दुसरी - ३० गुण, इयत्ता तिसरी व चौथी- ४० गुण , पाचवी व सहावी- ५० गुण तर सातवी व आठवी- ६० गुण
११)       चाचण्या कोणत्या इयत्तांसाठी असतील?
उत्तर  : पायाभूत चाचणी इयत्ता दुसरी ते आठवी तर संकलित चाचण्या इयत्ता पहिली ते आठवी
१२)       चाचण्या कोणत्या विषयांसाठी असतील?
उत्तर  : सन २०१५-१६ मध्ये प्रथम भाषा व गणित विषयांसाठी
१३)       चाचण्या कोणत्या व्यवस्थापन, बोर्ड व माध्यमांच्या शाळांसाठी लागू राहतील?
उत्तर  : चाचण्या राज्यातील सर्व व्यवस्थापन, बोर्ड व माध्यमांच्या शाळांसाठी लागू राहतील
१४)       चाचण्या कोण घेणार?
उत्तर  : वर्गशिक्षक
१५)       चाचण्यांसाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती कोण करणार?
उत्तर  : शिक्षक ,पर्यवेक्षीय अधिकारी,शिक्षणतज्ञ व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे (विद्यापरिषद)
१६)      सर्व व्यवस्थापन , माध्यम व बोर्डांच्या शाळांसाठी एकाच प्रकारच्या  प्रश्नपत्रिका असतील का?
उत्तर  : होय
१७)      प्रश्नपत्रिकांची निर्मिती करताना ग्रामीण आणि शहरी भाग स्वतंत्रपणे विचारात घेतला आहे का?
उत्तर  : होय. प्रथम भाषेच्या इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी
१८)       चाचणी बाबत व प्रश्नांच्या स्वरूपाबाबत अधिकची स्पष्टता कोठे मिळेल?
  उत्तर  : या संदर्भात दिनांक ७ जुलै २०१५ चे शासन परिपत्रक वाचावे.
१९)      चाचण्या पाठ्यांशावर आधारित असतील की क्षमतांवर आधारित असतील?
उत्तर  : प्रश्न क्षमतांवर आधारित असतील.
२०)      शाळेची श्रेणी कशी ठरविणार ?
उत्तर  : सर्व मुलांच्या गुणांवरून शेकडा प्रमाण विचारात घेऊन श्रेणी निश्चित केली जाईल.
२१)      शाळेची श्रेणी निश्चित करताना माझी समृद्ध शाळा व ग्रामविकास विभागाचे मूल्यमापन श्रेणीचा विचार केला जाणार का?
उत्तर  : नाही.
२२)      सेमी इंग्रजी वर्गाच्या चाचण्या घेताना गणित विषयाची चाचणी कोणत्या भाषेतून घ्यावी?
उत्तर  : इंग्रजी
२३)      चाचण्या घेताना एका वर्गाचा शिक्षक दुसऱ्या वर्गावर पाठवायचा का?
उत्तर  : नाही
२४)      चाचण्या घेण्यासाठी विद्यार्थांची बैठकव्यवस्था वेगळी असावी का?
उत्तर  : नाही.
२५)      राज्यात चाचणी एकाच दिवशी घ्यायची का?
उत्तर  : विद्यापरिषदेने निर्धारित केलेल्या कालावधीत कोणत्याही दिवशी चाचणी घेण्यात येईल.
२६)      चाचणी दिवशी काही कारणांनी विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्या विद्यार्थ्याची नंतर चाचणी घ्यायची का?
उत्तर  : निर्धारित कालावधीत कोणत्याही दिवशी चाचणी घेण्यात येईल.
२७)      एखाद्या विद्यार्थ्याची पायाभूत चाचणी एका शाळेत घेतली अन काही कारणांस्तव त्या विद्यार्थ्याची शाळा बदलली तर त्याची संकलित चाचणी कोणत्या शाळेने घ्यायची?
उत्तर  : संकलित चाचणीच्या वेळी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेने चाचणी घ्यावी.
२८)      पायाभूत चाचणी नंतर विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला तर दुसऱ्या शाळेने त्याची पायाभूत चाचणी पुन्हा घ्यायची का?
उत्तर  : नाही.
२९)       एखादा विद्यार्थी पायाभूत चाचणीच्या वेळी गैरहजर असेल अन त्यानंतर तो एकदम संकलित १ चाचणीच्या वेळी हजर राहिला तर त्याची पायाभूत व संकलित १ अशा दोन्ही चाचण्या घ्यायच्या का?
उत्तर  : नाही. मात्र संकलित चाचणी १ घेण्यात यावी.
३०)      संचयी नोंद पत्रिकेत विद्यार्थ्याचे पायाभूत चाचणीचे गुण लिहायचे का?
उत्तर  : नाही.
३१)      नसल्यास ,गुण नोंदविण्याची कार्यपद्धती काय राहील?
उत्तर  : सरल संगणक प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्यात येईल.
३२)      चाचण्या कोण तपासणार?
उत्तर  : वर्गशिक्षक/ विषय शिक्षक
३३)      तीनही प्रकारच्या चाचण्यामध्ये मुल अप्रगत आढळल्यास त्याला त्याच वर्गात ठेवायचे का?
उत्तर  : नाही.
३४)      शाळाबाह्य मुलांच्या चाचण्या घ्यायच्या का?
उत्तर  : होय
३५)      होय असल्यास कशाप्रकारे घ्यायच्या?
उत्तर  : शाळाबाह्य मुलाला नियमित शाळेत दाखल करून चाचण्या घेण्यात येतील.
३६)      पायाभूत चाचणीसाठी येणारा खर्च कोण पुरविणार ?
उत्तर  : प्रश्नपत्रिका छपाई व पुरवठा यासाठीचा खर्च राज्यशासन करेल.
३७)      प्रश्नपत्रिकांची छपाई व पुरवठा कोणामार्फत करण्यात येईल?
उत्तर  : विद्यापरिषद ,पुणे
३८)      ४० % पेक्षा कमी गुण असणारे मुल शिकण्यासाठी काय करावे?
उत्तर  : आधुनिक अध्ययना अध्यापन पद्धतीवर विशेष कृती कार्यक्रम विकसित करावा.
३९)      वर्गाची गुणवत्ता ठरविताना सतत गैरहजर विद्यार्थ्यासह वर्गाची गुणवत्ता काढायची का?
उत्तर  : होय
४०)      एखाद्या वर्गामुळे शाळेची श्रेणी घसरत असेल तर त्या शिक्षकावर कारवाई होणार का?
उत्तर  : नाही.
४१)      अप्रगत मुलांसाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केले जाणार आहे का?
उत्तर  : नाही
४२)      संपूर्ण वर्ग किंवा शाळा  प्रगत झाल्यास शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल काय?
उत्तर  : नाही.
४३)      अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्याचे काम कोण करणार?
उत्तर  : वर्गशिक्षक
४४)      अप्रगत विद्यार्थांना प्रगत करण्यासाठी शासन वेगळ्याने काही कार्यक्रम राबविणार आहे काय?
उत्तर  : नाही.
४५)      अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तास घ्यावे लागतील काय ?
उत्तर  : नाही.
४६)      विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरून शिक्षक , मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहले जाणार काय?
उत्तर  : होय
४७)      अप्रगत विद्यार्थ्याना प्रगत करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे काय?
उत्तर  : नाही.
४८)      अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाकडून पुस्तिका किंवा काही साहित्य मिळणार आहे काय?
उत्तर  : नाही.
४९)      अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी कोणते साहित्य वापरावे ?
उत्तर  : शाळांमध्ये उपलब्ध असलेले व यापूर्वी शासनाकडून पुरविण्यात आलेले शैक्षणिक साहित्य.
५०)      : सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे कटी टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
उत्तर  : १० %
५१)      राज्यस्तरावर दोन प्रकारचे कोणते अहवाल संकलित केले जातील?
उत्तर  : १) निष्पती अहवाल २) प्रक्रिया अहवाल
५२)      निष्पती अहवाल व प्रक्रिया अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे ?
उत्तर  :विद्यापरिषद ,पुणे
५३)      अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी कोणती पद्धती उत्कृष्ट आहे?
उत्तर  : ज्ञानरचनावादास धरून बहुवर्ग बहुस्तर अध्यापन
५४)      शिक्षकांनी कोणत्या बाबींमध्ये सक्षम राहणे आवश्यक आहे?
उत्तर  : विषयज्ञान , अध्यापन पद्धती व बालमानसशास्त्र
५५)      शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे?
उत्तर  :शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षण
५६)      भाषा व गणित विषयाचे उत्कृष्ट प्रशिक्षक कोठून मिळणार आहेत?
उत्तर  : सन २०१५-१६ मध्ये दिनांक २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार निवड करण्यात आलेल्या नवोपक्रम शाळांमधून
५७)      त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन म्हणजे काय?
उत्तर  : स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मूल्यमापन
५८)      त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन घेणे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे होत नाही का?
उत्तर  : नाही,
५९)       त्रयस्थ संस्थेची निवड कशी होणार?
उत्तर  : विद्यापरिषदेकडून या कामाचा अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अर्ज मागवून विहित प्रक्रियेद्वार निवड करण्यात येईल.
६०)      त्रयस्थ संस्थेच्या मुल्यामापनासाठी शाळांची निवड कशी करणार?
उत्तर  : यादृच्छिक (random)पद्धतीने
६१)      वर्गशिक्षकाने घेतेलेल्या पायाभूत चाचणी व त्रयस्थ संस्थेद्वारा घेतलेल्या संकलित चाचणी १ किंवा २  मधील मुलांच्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास वर्गशिक्षकांवर कारवाई होणार का?
उत्तर  : नाही.
६२)      त्रयस्थ संस्था त्यांच्या स्वत:च्या प्रश्नपत्रिका वापरून चाचणी घेणार का?
उत्तर  : नाही
६३)      मुलांना शिकविण्याची पूर्ण जबाबदारी कोणाची?
उत्तर  : शिक्षकांची
६४)      शिक्षकांना कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य असेल?
उत्तर  : वर्गामध्ये शिकविण्याची पद्धत , साहित्य इत्यादी बाबत
६५)      अप्रगत विद्यार्थ्यांना काय अध्यापन केले जाते याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून वेळोवेळी पर्यवेक्षण होणार आहे का?
उत्तर  : नाही.
६६)      गुणवत्ता वाढीसाठी पर्यावेक्षानाच्या दृष्टीने पोषक घटक कोणते ?
उत्तर  : मदत , समुपदेशन , सुलभीकरण ,मेंटरिंग
६७)      पर्यवेक्षीय यंत्रणेने मुलांची गुणवत्ता कशी तपासावी?
उत्तर  : मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून
६८)                              वर्गाची व शाळेची वार्षिक तपासणी पूर्वीच्याच पद्धतीने होणार का?
उत्तर  : नाही.
६९)      प्रथम भाषा व गणित विषयांचे आकारिक मूल्यमापन करायचे का?
उत्तर  : होय
७०)      आकारिक मूल्यमापनाच्या नोंदी करायच्या का?
उत्तर  :होय
७१)      अप्रगत विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना साधारण व प्रगत मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणती पद्धती योग्य राहील ?
उत्तर  : बहुस्तर
७२)      एकाच शिक्षकाने एकापेक्षा अधिक  वर्गांना अध्यापन करण्यासाठी कोणती पद्धती योग्य राहील?
उत्तर  : बहुवर्ग
७३)      शिक्षकाला प्रशिक्षणाची मागणी कोणाकडे नोंदवावी?
उत्तर  : केंद्रप्रमुख
७४)      प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका काय असेल?
उत्तर  : शिक्षकांना आवश्यक तेथे मदत आणि या कार्यक्रमाबाबत पालक व समाजामध्ये जागृती
७५)      शासन कोणत्या शाळांना tablet देणार ?
उत्तर  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना