*पाबरगड*
बहिरोबा_पाबरगड
पायथ्याचे गाव -मुतखेल , गुहीरे , भंडारदरा , तेरुंगन.
ता-अकोले
जिल्हा-अहमदनगर
उंची - १५०० मीटर (अंदाजे ) (५००० फूट )
प्रकार - कठीण
गडावर जाण्याचा मार्ग -१) मुतखेल २) गुहिरे ३ ) भंडारदरा.
गडावर जाण्यासाठी लागणार वेळ- २ तास 30 मिनिटे
पाण्याची उपलब्धता- १२ महिने
गडावरील पाहण्याची ठिकाणे- बैरोबा मंदिर , वेताळ टेकडी , पाण्याची १३ टाके.

अकोले तालुक्यातील भंडारदरा निसर्गरम्य परिसर पर्यटक, गिर्यारोहक, निसर्गप्रेमी,इतिहास अभ्यासकांना अत्यंत आवडीचा. परिसरातील भंडारदरा धरण, घाटघर प्रकल्प आणि कोकणकडा, सांदन दरी, रतनगड, अमृतेश्वर मंदीर, रंधा धबधबा , अंब्रेला फॉल आदी ठिकाणी दरवर्षी हजारो लाखो पर्यटक भेट देतात.परंतु यात एक ठिकाण अत्यंत उपेक्षित राहीले आहे ते म्हणजे 'पाबरगड'.
घोटी राजूर रस्त्यावरील रंधा धबधब्याजवळून उजव्या बाजूस फुटणाऱ्या फाट्याने भंडारदऱ्याकडे रस्ता जातो. याच रस्त्याने पुढे गेल्यास 'मुतखेल' हे गाव लागते.
नळीची वाट
गावातून गडाचे दर्शन होत नाही .माचीवरून आमच्या शेतातून थोडे पुढे गेले कि नळीची वाटेने आम्ही हळूहळू गड चढाईस सुरुवात केली.वर काळ्याशार ढगांच पांघरुन अन भन्नाट वारा छेदत पहिले टेकूड पार करून दुसऱ्या डोंगराचा कातळकडा डाव्या बाजूस ठेऊन कपारीने चालतानाची पायवाट अत्यंत अरूंद असून खबरदारी घेत घेत पार केल्यावर एका खिंडीत येऊन पोहचलो अन इथूनच गडाचा मुख्य डोंगर सुरु झाल्याच्या खाणाखुणा दिसू लागल्या . थोडासा कातळटप्पा पार करून आल्यावर खडकात खोदलेले चौकोनी खोबणे अन पुढे कोरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर परत निसरड्या वाटेने चढत गेलो अन दुसऱ्या कातळटप्प्याच्या उजळीकडील गुहांमध्ये विसावलो. येथे दोन गुहा असून एकीत टाके खोदलेले आहे पण ते कोरडे आहे.या गुहेत मुक्कामाची सोय होऊ शकते. तर पुढच्या गुहेत पिण्यायोग्य अत्यंत चवदार पाणी असून तिथेच उघड्या खडकावर शिवपिंड अन नंदी कोरलेला आहे.

हे दृश्य मनात अन कॅमेरात साठवून परत माघारी येऊन दुसरा कातळटप्पा पार केला अन किल्ल्याच्या मुख्य पठारावर येऊन पोहचलो .
इथून दिसणारा प्रदेश अन आल्हाददायक वातावरणाने क्षणाधार्थ सगळा थकवा दूर होऊन नवचैतन्य पसरल्याच्या सगळ्या खाणाखुणा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.समोरच एक अर्धवट भिंती असलेल्या चौथऱ्यावर भैराबाचा तांदळा असून हे आसपासच्या लोकांचे आराध्य दैवत आहे. प्रवेशद्वारावर बांधलेल्या घंट्या अन मधे असलेल्या त्रिशूळांची संख्या लक्षात घेता येथे नवस बोलले जात असल्याची शक्यता वाटते.
बहिरोबा देवस्थान सोबत धाकटे बंधू प्रवीण
मंदिरामागे पाण्याची पाच जोडटाकी आहेत पैकी एक टाके बुजले असून एकात आजही पिण्यायोग्य पाणी आहे , परंतु नियमित साफसफाईची गरज आहे . भैरोबाचे दर्शन घेऊन मामा अन परिवाराने आम्हाला पुढचा मार्ग सांगत ते माघारी कारवी तोडण्यास निघून गेले.

मग आम्ही सरळ वरच्या माथ्यावर आल्यावर प्रवीणने शेंडी वरून पांडूशेठ अवसरकर यांच्याकडून तयार करून घेतलेला भगवा झेंडा मोठ्या उंच लोखंडी पोल ला बधून पोल घट्ट रोवला. पुढे 'वेताळ' देवस्थान असून त्याजवळ अनेक लाकडी मोगऱ्या (धोपाटणे) ठेवलेले दिसले.
इथून सह्याद्रीच्या बऱ्याच परीसराचे विहंगम दृश्य नजरेत भरले. दक्षिणेस धामणवनाचा डोंगर माहुलीच्या डोंगराची आठवण करून देत होता पश्चिमेस आजोबा ,काताराबाई , रतनगड, खुट्टा सुळका ढगांचा शेला बांधल्यागत भासत होते उत्तरेस अलंग, मदन, कुलंग ,कळसुबाई शिखर , भंडारदरा धरण अन त्याचा नागमोडी जलसाठा मन मोहून घेत होता. पूर्वेकडे प्रवरेचे पात्र, रंधा धबधबा चेमदेवाचा डोंगर आपले अस्तित्व दाखवून खुणावत होता.
आसपासची छोटीछोटी गावं आपले अस्तित्व अन तयार करून ठेवलेली शेतं पावसासाठी आसुसलेली होती. सर्व आधाशासारखा गिळत असल्याचे पाहून पोटालाही भूक लागल्याची जाणीव झाली. लगेच परत खाली उतरून भैरोबाजवळील एका कोरड्या टाक्यात पेटपूजा करून डावीकडील रस्ता धरला. पुढे खांब असलेले पाण्याचे टाके असून तीन झरोके दिसतात. आसपास अनेक घरांची जोती येथील रहीवासाची साक्ष देतात पुढे परत पाण्याची चार टाकी असून त्यात पाणीही आहे. पुढे वळसा घेत चालून आले की पश्चिमेकडे जाणाऱ्या सोंडेला विलग करणारी खिंड ओलांडून गेले की सोंडेवर एक मोठे टाके आणि घरांचे तसेच खापराच्या फुटलेल्या माठाचे अन उखळाचे अवशेष दिसून आले.
येथून दिसणारा विलोभनीय निसर्गाचा अविष्कार अवर्णणीयच! अर्धा तास तिथून आम्ही बरेच सह्याद्रीचे विहंगमय दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.
वेताळाचा डोंगर
गडावरून दिसणार कोरडा पडलेला भंडारदरा जलाशय
खिंडीजवळ गोलाकार तासलेले टाके दृष्टीस पडले. टाक्यात स्वच्छ पाणी असून भिंतीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे.
हनुमान टाके
तेथून भैरोबाकडे येताना अजून एक लहानसे टाके असून ते कोरडे आहे.
हे सर्व पाहील्यावर गडफेरी संपली.
गडावर जागोजागी दिसणाऱ्या विष्ठा येथे जंगली प्राण्यांचा वावर असल्याची साक्ष पटवतात. गडावर अर्जुन सादडा सह अनेक आयुर्वेदिक वन औषधी आढळल्या.परतीचा रस्ता धरून आम्ही गावातून दिसणाऱ्या डोंगरसोंडेवर आलो पण नेहमीप्रमाणे जाताना नाही पण येताना न चुकता रस्ता चुकलोच. पाण्याच्या प्रवाहाच्या एका नळीतून कसेबसे
''काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता
चल गावाकडे माझ्या दोस्ता''
हे गाणे गुणगुणत सरबडत उतरून गावात पोहचलो.
हे गाणे गुणगुणत सरबडत उतरून गावात पोहचलो.
अशा या इतिहाससिद्ध परंतु अनभिज्ञ असलेल्या गडावर सहसा कोणी फिरकत नाही.
रमणीय सुंदर राकट अन भुलवणारा अपरिचीत उपेक्षित असलेला हा वारसा तमाम सह्यवेड्या गडवाट्यांना आर्त हाका देत धीरोधात्तपणे ऐतिहासिक खुणा अन मुक इतिहास जपत आपली वाट पहात आहे.
रमणीय सुंदर राकट अन भुलवणारा अपरिचीत उपेक्षित असलेला हा वारसा तमाम सह्यवेड्या गडवाट्यांना आर्त हाका देत धीरोधात्तपणे ऐतिहासिक खुणा अन मुक इतिहास जपत आपली वाट पहात आहे.