Friday, 14 May 2021

अक्षय तृतीया (आखाजा)

🌱🌾🌿 *आखातीचा सन आनी त्यामागील रहस्य....!* 🌾🌿🌱

  " आदिवासिंच्या सन(उत्सव) पैकी विशिष्ट रितीरिवाज पध्दतिने  मोठया उत्साहात साजरा केला जानारा सन म्हनजे *"आखाती"* होय. *केवळ  उत्सव म्हनुनच नव्हे तर त्याच्यामागील ऐतिहासिक रहस्य आहे.* पुर्विचा समाज हा खेडयापाडयांचा होता .लोकसंख्या मुबलक प्रमानात होती.निसर्गाचा समतोल & पाऊस वेलेवर पडत होता .निसर्गातील बदतलते चक्र बघुन पारंपारिक तर्कपध्दतिने शेती कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हनजे आखातीचा उत्सव सांगता येईल. *विशेष म्हनजे अभ्यासकांनाही याची कल्पना नसेल त्याच्याही कित्येक वर्षापासून पारंपारिक शेती मात्र प्रायोगिक पद्धतिने कल्पना मांडनारा आदिवासी समुदायात दिसुन येत आहे.* देशात शेतीवर आधारित विविध शोध घेतले गेलेले आहेत.मात्र गवराईच्या सनामागील जे रहस्य दडलेले आहे ते *काल्पनिकतेवर* आधारित नसुन आजही *वास्तविक* आहेत.
आज या समाजातिल उच्च शिक्षण घेतलेल्या वर्गाने विविध शोध घेउन M.Phil, PHD, च्या पदव्या मिलविलेल्या आहेत.याचा अभिमान वाटतो.विशेष म्हनजे सुशिक्षित युवा वर्गाने या बाबीकडे लक्षपूर्वक बघायला हवे.

 *सनाची सुरवात-* आखातीचा (गवराई) सन येन्याच्या 15 दिवसा अगोदर लाल, काळया  (चिकार) माती आनुन एका टोपलीमध्ये ठेवतात.मातिचा चुरा करून त्यामध्ये विविध प्रकारचे धान्य पेरले जातात.रोज सकाळ संद्याकाली नविन पान्याने गवराईला पानी घालतात. संद्याकाळच्या वेळेत  गावातील स्रीया एकत्र येऊन गवराईचे  गाने गातात....!
जसे की,
*आमच्या गवराईला एकच पान बाई... एकच पान..!*

असा ह्या लोकगितांचा  प्रकार दररोज म्हटले जाते.गवराईचे गाने म्हनजे मानवी मनाला एक चेतना निर्माण करनारी आहे.
*धान्याचे प्रकार:-* नागली, ऊडीद,मका,ज्वारी,वरई, अशा प्रकारचे विविध धान्य पेरले जातात. लोकांची भावना अशी की, *"ह्या वर्षात डाह्या मग का  पातलत्याय?* अर्थात एकप्रकारे वातानूकुलित आधारावर शेती कशी असावी.याचीच कल्पना मांडतांना दिसुन येत आहे.

*आखातीच्या दिवसाचा क्षण:-* या दिवशी  मनोरंजनाने बहरून गेलेला असतो.प्रत्येक जन आपापल्या घरी टिपरे बनविन्यात मग्न असतो.टिपरे उठावदार दिसावते म्हनुन रंग  आनी हस्तकलेचे रेखीव बघायला मिळतात. दुपारच्या 3.30 वाजेच्या दरम्यान गावातिल कोतवाल "दवंडी" देतो. ही जुनी प्रथा आजही बघायला मिळते.घराघरातिल स्रीया गवराई घेऊन सामुहिकतेने विहिरिच्या दिशेने वाटचाल करतात.गवराई घेऊन चालनारे पुढे त्यामागे लहान-मोठे मुले - मुली..!

*विहिरी जवळची प्रथा:-* विहिरी नजिक गेल्यावर विहिरिच्या चहुबाजुंनी गवराई ठेवतात.गवराईसाठी *"बोना"* ठेवतात. *"बोना म्हनजे पलसाच्या पानावर भात,डाल,मासे असतात त्याला बोना म्हटले जाते.*

*खजिन्याचा शोध:-*
जेवनाचा प्रकार झाल्यानंतर खजिन्याचा प्रकाराला सूरवात होते.खजिन्याचा प्रकार म्हनजे एक खेळच होय. गावातिल तरुनमुले निसर्गातिल 5 वनस्पती (पाने,फुले)गुपित आनतात.एका खडयात खोदुन ठेवतात.त्याचा शोध स्रीयांनी घ्यायचा असतो.शोध घेन्याकरिता गाने लाऊन एक एक गुपित ठेवलेल्या खजिन्याचा शोध घेन्याचे प्रयत्न करतात.वनस्पती म्हनजेच खजिना शोधल्यास स्रीयांचा विजय ! न शोधल्यास गुपित ठेवलेला खजिना मिळवन्याचा प्रयत्न करतात.

*गावाची कुलदैवत गावदेवी:-* त्यानंतर गावदेविचे दर्शन घेन्यासाठी जातात.तिथे नाचून गाऊन टिपरांचा आनंद लूटतात.टिपरांच्या प्रकारानंतर गावामध्ये ढोलाच्या तालावर आनी गान्याच्या बोलावर आनंदमय गवराईचा सन(उत्सव ) साजरा केला जातो.

   वरिल म्हटल्याप्रमाने, *शेतीवर आधारित अभ्यासकांनी विविध संशोधनात्मक प्रयोग झालेले आहेत.असे असतानाही त्याच्याही खुप वर्षापुर्वी आधुनिक तंत्राचा अभाव असतांना शेतीवर आधारित पारंपारिक पद्धतिने प्रयोगाची सुरवात प्रथमता येथे झालेले असावेत असा प्रश्न निर्माण करून अभ्यासकांना संशोधन करन्यास भाग पाडतो.*
उन्हाला  जान्याचा मार्गावर आनी पावसाळ सुरवात होन्यापुर्वी आखातिचा सन येतो यालाच अक्षय त्रुतिया या नावाने ओळखतात.आदिवासी समुदाय शेतीवर अवलंबुन असल्यामुळे शेतीतील जे पीक  पावसाल्यात घेत असतो ते कसे येतील? त्याच्यावर कोनता परिणाम होईल का?? निसर्गाच्या नियमावर आधारित जे पीके घेतली जातात त्या पींकांना अनुकूल पद्धतिचे वातावरण असेल का??अथवा त्याच्यावर विपरीत परिणाम होईल का? याची एकप्रकारे शहानिशा करन्याचे प्रयोग  करतांना दिसतो आहे.

आज सन(उत्सव ) म्हनजे मनोरंजनचा भाग म्हनुन न बघता कोनत्याही समाजातील संस्कृतीचे दर्शन घडविते.संस्कृतीचे महत्वच त्या  समाजातील अस्तित्वाची  ओळख होय.आदिवासी समाजात विशिष्ठ  (अनोळख्या) रितिरिवाज ,रुढी, परंपरा जपुन ठेऊन  विविध सन बघायला मिळतात.हे उत्सव म्हनजे निसर्गातिल वनस्पती , सजिव,प्राणीमात्राला अनुसरुन आहेत. मात्र अलिकडिल कालात या समाजातिल संस्कृतीतील सन (उत्सव) आनी मनोरंजनात्मक साहित्याचा लोप होत चालला आहे. 
आदिवासी समाज हा भोळे भाबडा असल्यामुळे  त्यांच्यात अनेक प्रकारचे अवैद्न्यानिक ,बुद्धिला न पटनारे,अंधश्रद्दा ,कर्मकांडामुळे स्वताचे अस्तित्व हिरावुन बसला आहे.स्वहिताबरोबर समाज दिशाहिन झालेला आहे. अशावेली त्याचे संरक्षन & संवर्धन करन्याची गरज भासत आहे.