Monday, 21 October 2013

Trek to lohagad

राजमाची

लोणावळ्याच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या पर्वतरांगेत राजमाची हे विस्तृत
पठार पसरलेलं आहे. या पठारावर २बालेकिल्ले वसलेले आहेत.
त्या २गडांपैकी थोडा कमी उंचीचा गड म्हणजे "मनरंजन गड".
राजमाची पॉईंट तसा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे पण त्यावर
असलेल्या या २ बालेकिल्ल्यांची नावे क्वचितच कोणाला माहीत
असावीत.
मनरंजन गडाला ३ प्रवेशद्वारे आहेत, तसेच गडावरची तटबंदी ही अतिशय
मजबुत आहे.आक्रमक दुर्गबांधणीचा प्रत्यय देणाऱ्या भक्कम
अशा या प्रवेशद्वारांची अवस्था आता मात्र केविलवाणी झाली आहे.
किल्ल्याच्या माथ्यावर किल्लेदाराच्या वाड्यावरचं जोतं, छप्पर
नसलेली पण मजबुत बांधणीची इमारत आणि त्यावर
असलेली गजाननाची मुर्ती हे सगळं अजुन शाबूत आहे.वर २-४
पाण्याच्या टाक्या आहेत. या गडावरून नागफणीचा सुळका, बोरघाटातील
रूळवाट, कर्जतच्या आसपासचा प्रदेश, ढाक-बहिरी, कर्नाळा,
माहुली असा बराच प्रदेश आपल्या नजरेस पडतो

Wednesday, 9 October 2013

भंडारदरा

भंडारदरा
भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल
या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक
अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज
यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१०
साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले.
भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले
जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे
त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला.
धरणाच्या भिंतीची उंची ८२.३२ मी. व तळाची रुंदी ७१.२८ मीटर
आणि माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे. धरणाला एकूण ८ मो-या असून
त्यांचा व्यास ४ मीटर एवढा आहे. धरणाचा पाणीसाठा ११०३९ दशलक्ष
घनफूट आहे. धरण बांधण्याचा खर्च ८४,१४,१८८ रुपये एवढा होता.
धरणाच्या पाण्याखाली बुडालेली जमीन २२९०० एकर आहे.
धरणाची प्रत्यक्ष लांबी ५०७ मीटर आहे. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात
१९७० मध्ये धरणाच्या भिंतीना आधार देण्यात आला.
त्यासाठी ४कोटी ८३ लाख रुपये खर्च आला. धरणाचे काम १९२६
साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर
लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले.
धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर
हिल यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे
पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात
झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून
या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे
पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत
असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून
टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते
तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष
डोळ्यांसमोर तरळत राहते. धरणाच्या भिंतीलगतच एक मोठी बाग तयार
करण्यात आलेली आहे. येथून अंब्रेला फॉलचा आनंद घेता येतो. तसेच
धरणाच्या सर्व मो-यांमधून सोडले जाणारे पाणी पाहताना वेळ
कसा भर्रकन निघून जातो ते कळतच नाही. धरणाच्या पाणीसाठ्यात
वर्षभर बोटिंगची सेवा उपलब्ध आहे. धरणाच्या भव्य व अथांग
पाण्यातून नौकानयन करण्याचा आनंद काही औरच असतो.

कुंजरगड (कोंबडगड)

कुंजरगड (कोंबडगड)
महादेव कोळी समाजाचे वर्चस्व असणारा सह्याद्रीतील एक अकोले
तालुक्यातील दुर्गरत्न म्हणजे कोंबडगड उर्फ कुंजरगड होय. निसर्ग
सौंदर्याचे अनोखे देणे असलेले फोफसंडी हे गाव आज
या गडाच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम करत आहे. गड आज
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे. इथे असणारे
ऐतिहासिक अवशेस, गडाचा बुरुज, शंकरांची पिंड अशा अनेक बाबी आज
संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्याकडे वेळीच लक्ष्य देवून अकोले
तालुक्याच्या भव्य ऐतिहासिक परंपरेचा साक्ष
देणारा हा ठेवा भावी पिढीसाठी जपून ठेवण्याची गरज आहे.
कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग
आडवी येते तीला बालाघाट रांग म्हणतात. हरीशचंद्र
गडाच्या मागच्या बाजूस येणार्या या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड
इत्यादी किल्ले येतात. "कुंज" या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे.
याचाच अपभ्रंश होऊन "कुजंरगड" असे पडले असावे. विहिर
या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड
भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात
या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन
होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील
किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत
किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात
अनेक सुंदर धबधबे आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २
वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून
जाणार्या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ
लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर
चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते.
या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर
ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक
मुर्ती हनुमानाची असून दुसर्या मुर्तीला काळोबा म्हणतात.
या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन मंदिर
बांधण्याचा गावकर्यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत
शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात.
या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन
कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन
आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते.
पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर
गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून
येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर
जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
अर्ध्या पायर्या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे
ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर
गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे.
पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग
होत असावा. हि गुहा पाहुन पायर्यांच्या मार्गाने उध्वस्त
प्रवेशव्दारातून आपण गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त
वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर
पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील
पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे
जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे
एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे
(पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून
प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.
येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ जाता गडाला (उजव्या बाजुला)
लागुन असणार्या डोंगरावर जावे. या डोंगरावर ३ नैसर्गिक गुहा आहेत.
गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे
बांधण्यासाठी करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात
जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१) विहिर गावातून :- विहिर गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण -
मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाव गाठावे. ओतुर बस
स्थानकाच्या बाजूने जाणार्या रस्त्याने (१६ किमी) ब्राम्हणगाव - (१६
किमी) कोतूळ -(१६ किमी) विहिर गाव आहे.विहिर
या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २
वाटा आहेत.
(अ) कुंजरगड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीतून गडावर
जाता येते.
(ब) कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून
किल्ल्यावर जाता येते.
त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून
जाणार्या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो.
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गड चढतांना खिंदी मार्गे चढावा तर
उतरतांना बाजूच्या डोंगरवरून उतरावा म्हणजे सर्व अबषेश पाहून होतात.
२) फोफसंडी गावाकडून :- फोफसंडी गावात पोहोचण्यासाठी मुंबई -
कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - खिरेश्वर गाठावे. खिरेश्वरच्या पुढे
फोफसंडी गावाला जाणारा फाटा आहे. गावातून एकच वाट कुंजर गडावर
जाते. या मार्गाने गडावर आल्यास हनुमानाची व
काळोबाची मुर्ती पहायला मिळत नाही. त्यासाठी डोंगराला वळसा घालून
विहिर गावाच्या बाजूस जाऊन परत फिरावे लागते. तसेच नैसर्गिक
गुहा पहाण्यासाठी वेगळा फेरा पडतो.
फोफसंडी गावाकडून गड चढून विहिर गावात उतरता येईल. परंतु
या भागात एसटीची सेवा मर्यादीत आहे. त्यामुळे स्वत:चे खाजगी वहान
असल्यास उत्तम.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. विहिर किंवा फोफसंडी गावांमध्ये शाळेत
राहण्याची सोय होऊ शकते.