Sunday, 30 August 2020

फोपसंडी

अहमदनगर जिल्ह्यातील अतिदुर्गम , दरीतील ,गाव म्हणजे अकोल्यातील "फोपसंडी" गांव
               अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे नंदनवन, भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, भटक्यांची पंढरी हरीचंद्रगड, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब आणि मोठी अशी सांदणदरी  , खडतर अति कठिण असे अलंग , मदन , कुलंग किल्ले , ही पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात.अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो. 
                  मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति "मॉरिशस" असलेलं हे 1200 लोकवस्तीचे " फोपसंडी" गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.
             या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी  "फोप" हे  घोड्यावरूनजंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या "पोफला" येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी "मांडवी नदीच्या" तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला(कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला "पोफसंडी" म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन "फोपसंडी" हे नांव रूढ झाले.ते आजतागायत तसेच आहे.
                      स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत मा.आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रयत्नाने वीज आली. रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.
     💐 अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे 💐
१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.
२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.
३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल.व दळणवळण, पर्यटन वाढेल.
४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.
५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.
६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते.त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.
             या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.
१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)
२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..
३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.
४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात " कोंबड किल्ला (कुंजीरगड), भदभद्याचा धबधबा,धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा,चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दऱ्या बाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.
५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.
६)पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.
                मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील "फोपसंडी" पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.
                     चला तर मग कधी निघताय पर्यटनाला"फोपसंडी"येथे.

Thursday, 27 August 2020

सह्याद्रीतील वनराई


              सह्याद्री पर्वतातील लोणावळा घाट ते नासिक त्रंबकेश्वर पर्यंत दक्षिणोत्तर अशा विस्तीर्ण पर्वत रांगेत आदिवासी महादेव कोळी जमातीचे लोक रहातात. या जगलचा संबंध येत असल्याने ते निसर्ग पूजा व प्राणी पूजा करतात. प्राण्यांच्या,झाडांच्या व पक्षांच्या नावावरुन त्यांनी आडनावे धारण केलेली आहेत. वरस, उंबर, पिंपळ, वड, कळब अशा झाडांना देव मानतात. या झाडांची लाकडे स्वयंपाकासाठी सरपण/जळण म्हणून वापरत नाहीत. निसर्गाला देव मानतात. वनदेव हा वनांचा संरक्षक असल्याने त्याच्या बनतील/ देवराईतील झाडे तोडत नाहीत.
        सह्याद्री पर्वत म्हणजे निसर्ग सौंदर्याच्या कोंदणात पाचू असल्याचा भास होतो. सह्याद्री पर्वतावरील मावळ प्रदेश वृक्ष वेलींनी नटलेला आहे. भीमाशंकर, आहुपे पठार, कुसरे पठार, हिवरे पठार, दुर्गगड, दुर्ग ढाकोबा, चावंड किल्ला, नाणेघाट, जीवधनगड, भैरवगड, दौंड्याडोंगर, माळशेजघाट, हरिश्चंद्रगड , कात्राबाई खिंड, भंडारदरा, रतनगड, बितनगड, अलंगगड, मलंगगड, कुलंगगड,पट्टा किल्ला, कळसुबाई शिखर, म्हसोबाचा डोंगर, हरिहरगड, चाळीसगाव डांगाण व बारागाव पठार, त्रंबकगड, अंजनेरी अशी कितीतरी ठिकाणे सांगता येतील. नानाविध वृक्षवेलींनी, फळाफुलांनी बहरलेल्या /डवरलेल्या वनराईतील थंडगार वातावरणाने मनुष्य मंत्रमुग्ध होतो.
          इथे अर्जुनसादडा, अशोकवृक्ष, अंजनवृक्ष, काळा अंजन,पांढरा अंजन, आम्र (अंबा), आसवला, आडुळसा, आशिंद, आवळा, कंठी आवळा, उंबर,एडिंग, पारोसा एरंड, तिडक्या एरंड, मोगली एरंड,कळक, करप, कलंब, कवठ,करंज,कडुनिंब, कहांडोळ, कुडळ, कोशिंब, कुसूंबी, कुंभा, कांचन,केंजळ, केळ,कैलासपती,पांढराकुडा, काळा कुडा, काकड,किवचा, कोहंबळ, करवंदी, खिळा, खरमाटी, खडसिंग, खैर, गुलकडी, गेळ, गुलमोहर, घाणेरी, घोटी, गांधारी (टणटणी), घायपत, चिमणाटी, चिल्हार, चंपक, सोनचंपक, चंदन, रक्तीचंदन, चिंच, जांभूळ, येहळा(बेहडा) येडी बाभूळ, येहकळ, टाहकळ, टेंबुर्णी, वड, वरस, वाघोटी, पळस, पळाटी, पायर, पिंपळ, पिंपर, पांगेरा, पांढरुख, साग, सादडा (ऐन),सालय, सायर (शाल्मली), सागरगोटा, सिताफळ, सिसम, सिसू, सिरस,काळा सिरस, पांढरा शिरस, सोनमोहर, सैतान, शिसव, शिवण, शिरड, शिद
(आपटा), शिंद, शिकेकाई, शेर, शेंद्री, रान शेवगा, हिवर, हळंदा, हिरड, मोह, महारुख, मोखा,मेड़सिंग,मेहंदी,बहुआ, बकान, बरवा, बारतोंडी, बेल, बोंडारा, बोथी, बिवला,बिब्बा, बोर, बाभुळ, बाम्बू,भारंगी, भुस्कुट,भोमा, भोकर, रान अंजीर, रामेठा, रुई, रीठा, नीलगिरी, निर्गुड़ी (वनई), नांदरुख, निवडूंग, धसई, धायटी, धावड़ा, धामण, तांबट, तोरण, ताम्हण, कारवी, माळ कारवी, टोपली कारवी, घुल्या कारवी, साबर, देवसाबर, लळय, लोखंडी, चिचुरडी, डिनी इत्यादि २५०पेक्षा जास्त झाडे तसेच गोयली, गारवेल, गारबी, गुंज, गुळवेल, गोकर्ण, गोमेटी, गिरंदोळी, मेकी, मोरवेल (रानजाई), म्हसवेल, कळलावी, कांडवेल, कावळी, भुईकावळी, ढोरकावळी, कुसर, कुयरु, खाजकुयरु, खरपुडी, करटोली, वासनसडा, नंदाना, पीठाना, डोळेफुटी,बलवरा, बेडकी, भोवरा, चाई, तांबुळचाई,  चांदवेल, चिबडू, फांजी , हळंदा, आबय, अंभेळ, इत्यादी वेली आढळतात.
        कोल्ह्याची मका, कर्दळ (देवकेळी), रानकेळी(कौदर), दिवा(सापकांदा), बडदा(रान सुरण), रानभेंडी, चिचुरडे (रानवांगे), दुधकांड, तरवट, भुईतरवट, सोनतरवट, खिरकुंद, चित्रुक, कांड्या चित्रुक, करटकांगोणी, सांबर, चिकण चोपडी, धोटा, फांगुळणी इत्यादी झुडपे आढळतात.
         रोहिड, सुराड, वावशा,  कुसळी, मारवेल, मोळ, कोथीर,  कराड, कुंदा, शिप, शेवरी, शेडू, हरळी (दुर्वा), बरग, बरकी, बुरांडी, भोस, दवणा, वाळा, कसई, कुरडू (कोंबडा), उंदरी, उन्हाळी, पाथरी इत्यादी गवताचे प्रकार आढळतात.
         हिरव्या रंगाचे बनच बन पसरलेले आहेत, या बनात पाचूकवडा, कबुतर, कस्तुरी, काळचिट, कावळा, डोमकावळा, पाणकावळा, कुरव, कुरळ, कोकीळ, कारुण्य कोकीळ, कोयळ, कोतवाल, काळा कोतवाल, पांढऱ्या शेपटीचा कोतवाल, पांढऱ्या पोटाचा कोतवाल, कोकात्री, कुंभारकुकडा (भारव्दाज), खाटीक, भुरा खाटीक, जगल खाटीक, खिळखिळा,खंड्या, छोटा खंड्या, गरुड, पिंगट गरुड, काळा गरुड, तुरेवाला गरुड, सर्पगरुड, गप्पीदास, कबरा गप्पीदास, गोरली, गोजा, तपकिरी गोजा, नारंगी, गोमेट, गोगीपांडू, घार, कापशी घार, घुबड, हुमणी घुबड, गव्हाणी घुबड, छोटीकर्णी घुबड, चष्मेवाला पक्षी,चक्रवाक, चास (निलपंखी), चातक, चिमणी, वृक्षतीरचिमणी, तितरचिमणी, चिलखा, कंठेरी चिलखा, चितार, चिय, चिरक, चंडोल, तुरेवाला चंडोल, चेंडूर्ली, छानछडी, टिटवी, माळ टिटवी, लाल गाठीची टिटवी, टिबुकली, डोंबारी, तितर,रंगीत तितर, ताणमोर, तारवाली देवकिन्हई, तांबटपक्षी, थिरथीरा, दयाळ,  धनछडी, धनचुवा, धाविक, धोबी, पांढरा धोबी, पिवळा धोबी, नाचरा, निलिमा, नीलपरी, नीळकंठ, नवरंग, निलांग, परटिण, पंकोळी,खंड्या पंकोळी, धूसर पंकोळी, पारवा,पावशा, फुलटोच्या, काळी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी,पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पिठऊभळी, पिंगळा, रान पिंगळा,पोपट, बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा, गाय बगळा, रात बगळा, बाज, बंड्या, बुलबुल, बोचुरडे, भारीट, लालशीर्ष भारीट,भैरा, भोवरी (भिंगरी),भोरेडी, मैना, ब्राम्हणी मैना, डोंगरी मैना, पळस मैना,मोर,मुनिया, खवल्या मुनिया, लाल मुनिया, काळा मुनिया,तिरंगी मुनिया, ठिपकेदार मुनिया, मुरारी,राघू, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू,रातवा, रामगंगा, लांडोर,लावरी,वर्षा लावरी, जगली लावरी,गवती लावा, लिटकुरी, वटवट्या, धान वटवट्या,राखी वटवट्या, शर वटवट्या, पिवळ्या डोक्याचा वटवट्या, वटवाघूळ(दिवाभीत), वारकरी, वंचक, नकटा वसू, शेणकुटी,श्यामा, शिकारा, शिंपी, श्येन, श्वेतकंठी, स्वर्गीय नर्तक, ससाणा, बहिरी ससाणा, शाही ससाणा, सकेर ससाणा, देव ससाणा, पांढरा ससाणा, तुतुमती ससाणा, साळुंखी, सातभाई, छोटा सातभाई, मोठा सातभाई, पितनेत्री सातभाई, सुतार, सुभग, सुगरण(गवळण), सुरय, नदी सुरय, पारशी सुरय,  ताम्रमुखी सूरय, सूर्यपक्षी, जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी, सोनपंखी, छोटा शराटी, पांढरा शराटी, शिकारी पक्षी, शिक्रा, शिंजीर, हळद्या, कृश्नशीर्ष हळद्या, हळदीकुंकू, हुप्पो,होलगा, छोटा होलगा, तांबडा कंठेरी होलगा अशा कितीतरी पक्ष्यांच्या किलकिलाटाने रान निनादुन उठते.
     वाघ, कोल्हा, लांडगा, तरस, माकड, वानर, हरीण, सांबर, काळवीट, भेरकर, ससा, रानमांजर, उड, बाऊल, सायळ(साळीं दर) रानडुक्कर, मुंगूस, खोकड, खार, शेकरू इत्यादी प्राणी व मोहंडुळ, नाग, फोडसा, घोणस, धामण, चूड, वाळा, दुतोंड्या, हरणटोळ, छापड्या, इरोळा, कहांडोळ, अजगर, घोरपड, गुहिरा, सरडा  इत्यादी सरपटणारे प्राणी आढळतात. घनदाट अरण्य, गर्द झाडी,श्वापदांचे अधूनमधून होणारे आवाज, काट्याकुट्यांची रेलचेल, वेली ,झाडे,फळाफुलांनी बहरलेली असलेली,सर्वत्र सुगंध दरवळत असल्याने मन प्रफुल्लित होते.

Friday, 14 August 2020

Trek Camp Point Bhandardara

Trek Camp Point Bhandardara
                                       Enjoy the peacefull and natural pollution free environment on bank of a Aurther
lake. At night the place is covered with the moonlight.  where you can
enjoy and relax beneath clear skies.

We Provides-

*Comfortable accommodation in tents on sharing basis with camping mattress
*Welcome drink (Tea/coffee)
*Dinner (Veg/Non veg)
*Breakfast
*Bonfire
*Games & Activities
*Toilets available

For details or booking call/ WhatsApp on +919136818944
Email- bhandardaradam1926@gmail.com
Instagram
https://www.instagram.com/trek_camp_point/
Facebook
https://m.facebook.com/bhandardara.dam.9

Check out this on Justdial!

https://www.justdial.com/DT-996I2AY6E6Q

Thursday, 13 August 2020

Farm Of Happiness

                आमची आनंदी शेती


                                      भात शेती 
      
                                चुलीवर भाजलेली चिकन तंदुरी

                                   भात कापणी ( सवंंगणी )


                                                  पाबर गड
शेळी पालन


                                 वांग्याची रोपे

                  चाईचा बार



                     खुरासनी 





                               काचाड्या

                               चाईचा बार (मोहोर)