सह्याद्री पर्वतातील लोणावळा घाट ते नासिक त्रंबकेश्वर पर्यंत दक्षिणोत्तर अशा विस्तीर्ण पर्वत रांगेत आदिवासी महादेव कोळी जमातीचे लोक रहातात. या जगलचा संबंध येत असल्याने ते निसर्ग पूजा व प्राणी पूजा करतात. प्राण्यांच्या,झाडांच्या व पक्षांच्या नावावरुन त्यांनी आडनावे धारण केलेली आहेत. वरस, उंबर, पिंपळ, वड, कळब अशा झाडांना देव मानतात. या झाडांची लाकडे स्वयंपाकासाठी सरपण/जळण म्हणून वापरत नाहीत. निसर्गाला देव मानतात. वनदेव हा वनांचा संरक्षक असल्याने त्याच्या बनतील/ देवराईतील झाडे तोडत नाहीत.
सह्याद्री पर्वत म्हणजे निसर्ग सौंदर्याच्या कोंदणात पाचू असल्याचा भास होतो. सह्याद्री पर्वतावरील मावळ प्रदेश वृक्ष वेलींनी नटलेला आहे. भीमाशंकर, आहुपे पठार, कुसरे पठार, हिवरे पठार, दुर्गगड, दुर्ग ढाकोबा, चावंड किल्ला, नाणेघाट, जीवधनगड, भैरवगड, दौंड्याडोंगर, माळशेजघाट, हरिश्चंद्रगड , कात्राबाई खिंड, भंडारदरा, रतनगड, बितनगड, अलंगगड, मलंगगड, कुलंगगड,पट्टा किल्ला, कळसुबाई शिखर, म्हसोबाचा डोंगर, हरिहरगड, चाळीसगाव डांगाण व बारागाव पठार, त्रंबकगड, अंजनेरी अशी कितीतरी ठिकाणे सांगता येतील. नानाविध वृक्षवेलींनी, फळाफुलांनी बहरलेल्या /डवरलेल्या वनराईतील थंडगार वातावरणाने मनुष्य मंत्रमुग्ध होतो.
इथे अर्जुनसादडा, अशोकवृक्ष, अंजनवृक्ष, काळा अंजन,पांढरा अंजन, आम्र (अंबा), आसवला, आडुळसा, आशिंद, आवळा, कंठी आवळा, उंबर,एडिंग, पारोसा एरंड, तिडक्या एरंड, मोगली एरंड,कळक, करप, कलंब, कवठ,करंज,कडुनिंब, कहांडोळ, कुडळ, कोशिंब, कुसूंबी, कुंभा, कांचन,केंजळ, केळ,कैलासपती,पांढराकुडा, काळा कुडा, काकड,किवचा, कोहंबळ, करवंदी, खिळा, खरमाटी, खडसिंग, खैर, गुलकडी, गेळ, गुलमोहर, घाणेरी, घोटी, गांधारी (टणटणी), घायपत, चिमणाटी, चिल्हार, चंपक, सोनचंपक, चंदन, रक्तीचंदन, चिंच, जांभूळ, येहळा(बेहडा) येडी बाभूळ, येहकळ, टाहकळ, टेंबुर्णी, वड, वरस, वाघोटी, पळस, पळाटी, पायर, पिंपळ, पिंपर, पांगेरा, पांढरुख, साग, सादडा (ऐन),सालय, सायर (शाल्मली), सागरगोटा, सिताफळ, सिसम, सिसू, सिरस,काळा सिरस, पांढरा शिरस, सोनमोहर, सैतान, शिसव, शिवण, शिरड, शिद
(आपटा), शिंद, शिकेकाई, शेर, शेंद्री, रान शेवगा, हिवर, हळंदा, हिरड, मोह, महारुख, मोखा,मेड़सिंग,मेहंदी,बहुआ, बकान, बरवा, बारतोंडी, बेल, बोंडारा, बोथी, बिवला,बिब्बा, बोर, बाभुळ, बाम्बू,भारंगी, भुस्कुट,भोमा, भोकर, रान अंजीर, रामेठा, रुई, रीठा, नीलगिरी, निर्गुड़ी (वनई), नांदरुख, निवडूंग, धसई, धायटी, धावड़ा, धामण, तांबट, तोरण, ताम्हण, कारवी, माळ कारवी, टोपली कारवी, घुल्या कारवी, साबर, देवसाबर, लळय, लोखंडी, चिचुरडी, डिनी इत्यादि २५०पेक्षा जास्त झाडे तसेच गोयली, गारवेल, गारबी, गुंज, गुळवेल, गोकर्ण, गोमेटी, गिरंदोळी, मेकी, मोरवेल (रानजाई), म्हसवेल, कळलावी, कांडवेल, कावळी, भुईकावळी, ढोरकावळी, कुसर, कुयरु, खाजकुयरु, खरपुडी, करटोली, वासनसडा, नंदाना, पीठाना, डोळेफुटी,बलवरा, बेडकी, भोवरा, चाई, तांबुळचाई, चांदवेल, चिबडू, फांजी , हळंदा, आबय, अंभेळ, इत्यादी वेली आढळतात.
कोल्ह्याची मका, कर्दळ (देवकेळी), रानकेळी(कौदर), दिवा(सापकांदा), बडदा(रान सुरण), रानभेंडी, चिचुरडे (रानवांगे), दुधकांड, तरवट, भुईतरवट, सोनतरवट, खिरकुंद, चित्रुक, कांड्या चित्रुक, करटकांगोणी, सांबर, चिकण चोपडी, धोटा, फांगुळणी इत्यादी झुडपे आढळतात.
रोहिड, सुराड, वावशा, कुसळी, मारवेल, मोळ, कोथीर, कराड, कुंदा, शिप, शेवरी, शेडू, हरळी (दुर्वा), बरग, बरकी, बुरांडी, भोस, दवणा, वाळा, कसई, कुरडू (कोंबडा), उंदरी, उन्हाळी, पाथरी इत्यादी गवताचे प्रकार आढळतात.
हिरव्या रंगाचे बनच बन पसरलेले आहेत, या बनात पाचूकवडा, कबुतर, कस्तुरी, काळचिट, कावळा, डोमकावळा, पाणकावळा, कुरव, कुरळ, कोकीळ, कारुण्य कोकीळ, कोयळ, कोतवाल, काळा कोतवाल, पांढऱ्या शेपटीचा कोतवाल, पांढऱ्या पोटाचा कोतवाल, कोकात्री, कुंभारकुकडा (भारव्दाज), खाटीक, भुरा खाटीक, जगल खाटीक, खिळखिळा,खंड्या, छोटा खंड्या, गरुड, पिंगट गरुड, काळा गरुड, तुरेवाला गरुड, सर्पगरुड, गप्पीदास, कबरा गप्पीदास, गोरली, गोजा, तपकिरी गोजा, नारंगी, गोमेट, गोगीपांडू, घार, कापशी घार, घुबड, हुमणी घुबड, गव्हाणी घुबड, छोटीकर्णी घुबड, चष्मेवाला पक्षी,चक्रवाक, चास (निलपंखी), चातक, चिमणी, वृक्षतीरचिमणी, तितरचिमणी, चिलखा, कंठेरी चिलखा, चितार, चिय, चिरक, चंडोल, तुरेवाला चंडोल, चेंडूर्ली, छानछडी, टिटवी, माळ टिटवी, लाल गाठीची टिटवी, टिबुकली, डोंबारी, तितर,रंगीत तितर, ताणमोर, तारवाली देवकिन्हई, तांबटपक्षी, थिरथीरा, दयाळ, धनछडी, धनचुवा, धाविक, धोबी, पांढरा धोबी, पिवळा धोबी, नाचरा, निलिमा, नीलपरी, नीळकंठ, नवरंग, निलांग, परटिण, पंकोळी,खंड्या पंकोळी, धूसर पंकोळी, पारवा,पावशा, फुलटोच्या, काळी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी,पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पिठऊभळी, पिंगळा, रान पिंगळा,पोपट, बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा, गाय बगळा, रात बगळा, बाज, बंड्या, बुलबुल, बोचुरडे, भारीट, लालशीर्ष भारीट,भैरा, भोवरी (भिंगरी),भोरेडी, मैना, ब्राम्हणी मैना, डोंगरी मैना, पळस मैना,मोर,मुनिया, खवल्या मुनिया, लाल मुनिया, काळा मुनिया,तिरंगी मुनिया, ठिपकेदार मुनिया, मुरारी,राघू, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू,रातवा, रामगंगा, लांडोर,लावरी,वर्षा लावरी, जगली लावरी,गवती लावा, लिटकुरी, वटवट्या, धान वटवट्या,राखी वटवट्या, शर वटवट्या, पिवळ्या डोक्याचा वटवट्या, वटवाघूळ(दिवाभीत), वारकरी, वंचक, नकटा वसू, शेणकुटी,श्यामा, शिकारा, शिंपी, श्येन, श्वेतकंठी, स्वर्गीय नर्तक, ससाणा, बहिरी ससाणा, शाही ससाणा, सकेर ससाणा, देव ससाणा, पांढरा ससाणा, तुतुमती ससाणा, साळुंखी, सातभाई, छोटा सातभाई, मोठा सातभाई, पितनेत्री सातभाई, सुतार, सुभग, सुगरण(गवळण), सुरय, नदी सुरय, पारशी सुरय, ताम्रमुखी सूरय, सूर्यपक्षी, जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी, सोनपंखी, छोटा शराटी, पांढरा शराटी, शिकारी पक्षी, शिक्रा, शिंजीर, हळद्या, कृश्नशीर्ष हळद्या, हळदीकुंकू, हुप्पो,होलगा, छोटा होलगा, तांबडा कंठेरी होलगा अशा कितीतरी पक्ष्यांच्या किलकिलाटाने रान निनादुन उठते.
वाघ, कोल्हा, लांडगा, तरस, माकड, वानर, हरीण, सांबर, काळवीट, भेरकर, ससा, रानमांजर, उड, बाऊल, सायळ(साळीं दर) रानडुक्कर, मुंगूस, खोकड, खार, शेकरू इत्यादी प्राणी व मोहंडुळ, नाग, फोडसा, घोणस, धामण, चूड, वाळा, दुतोंड्या, हरणटोळ, छापड्या, इरोळा, कहांडोळ, अजगर, घोरपड, गुहिरा, सरडा इत्यादी सरपटणारे प्राणी आढळतात. घनदाट अरण्य, गर्द झाडी,श्वापदांचे अधूनमधून होणारे आवाज, काट्याकुट्यांची रेलचेल, वेली ,झाडे,फळाफुलांनी बहरलेली असलेली,सर्वत्र सुगंध दरवळत असल्याने मन प्रफुल्लित होते.
No comments:
Post a Comment