आदिवासी म्हणजे भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतीची धगधगती मशाल, भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी सर्वाधिक रक्त सांडले ते आदिवासी क्रांतिकारक व विरांगणांचे, पण देशाला स्वातंत्र मिळताच या क्रांतिकारकांचा इतिहासच संपतो.
असाच खोट्या इतिहासकारांनी दृष्टीपलिकडे ठेवलेला
आदिवासी योद्धा विर भागोजी नाईक(पवार).सिन्नर तालुक्यातील २५ किमी अंतरावर असलेल्या नांदुरशिंगोटे गावी त्यांचा जन्म स्वातंत्रपुर्व काळात झाला.ब्रिटीशांनी संपुर्ण देश काबिज केला होता .भारतातील सर्व राजे,महाराजे इग्रजांचे अंकीत-गुलाम बणुन आपला राजकारभार ब्रिटीशांच्या हुकूमाप्रमाने चालवत होते, पण याच देशात असा एक समाज होता, जंगलात राहणारा, कंदमुळे खाणारा , निसर्गाला देव माणुन पुजणारा आदिवासी,त्याने कधी इग्रजांची गुलामी पत्करली नाही आणि शेवट पर्यत लढत राहिला.आदिवासी बंडकर्यांच्या देशात अनेक टोळ्या होत्या आणि त्या ब्रिटीश सरकारला आवाहन देत होत्या .आदिवासी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी इग्रजांनी आदिवासींचीच तरुण पोर सैन्यात भरती करायला सुरुवात केली .भागोजीला देखिल सैन्यात भरती करण्यात आले, पण ब्रिटीश अधिकारी भागोजीकडे सतत संशयाने बघत, आदिवासी बंडकर्यांना मदत करत असल्याचे आरोप होत, ब्रिटीशांसोेबत प्रामाणिक राहूण आपण आपल्याच देशबांधवांवर शस्र उचलत होतो याची भागोजीच्या मनात खंत होतीच, शेवटी देशाला स्वतंत्र्य मिळावे ही प्रत्येक देशवासियाचे ध्येय होते, तेच ध्येय उरी बाळगून भागोजी नाईकांनी बंडात उडी घेतली,
ब्रिटीश सरकारणे नुकतेच नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे येथे सळो की पळो करुन सोडणार्या राघोजीचे बंड १८४८ मध्ये मोडून काडले होते,
त्याचवेळी इंग्रजांच्या पलटनीमध्ये तयार झालेला भागोजी बडकर्यात सामिल झाला, ५० भिल्ल व महादेव कोळी बंडकर्याना सोबत घेवून पुन्हा आदिवासी बंडकर्यांचा दबदबा नाशिक, नगर जिल्हात कायम ठेवला, नाशिक, पुणे, नगरचे रस्ते भागोजीने त्याब्यात घेतले, इंग्रजांचे दळणवळणाचे मार्ग आडवून त्यांना हैराण केले, नाशिक, पेठ, हरसुल येथे झालेल्या चकमकीत इंग्रजांना नमवले,
भागोजीच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी कॅ.हेन्री ला भागोजीवर सैन्य घेवून पाठवले, त्यावेळी भागोजी नाईक चासखिंडीत होता तेथेच इंग्रज व भागोजी नाईक यांच्यात लढाई झाली, त्यात भागोजीला मारण्यास आलेला हेन्री भागोजीच्या बंदुकीच्या गोळीचा शिकार झाला,
ही बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली, आदिवासी बंडकर्याचा उत्साह वाढत होता, पण भागोजीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज फितुरी, इनाम यासारख्या सर्व चाली खेळू लागले . त्यात त्यांना यश देखिल आले, १८५८ चा उठाव इंग्रजांनी नुकताच मोडून काढला होता.भागोजीचेपण आता वय ५७-५८ झाले होते, भाऊ महिपत व मुलगा बंडात कामी आला होता, तरी देखिल नाईकाचा लढा चालुच होता,
खबर्याने दिलेली बातमी खरी होती, भागोजीला व त्याच्या साथीदारांना गोदावरी तिरी सांगवीच्या बेटावर आफाट इंग्रज सैन्यान रातोरात घेरल, दिवस उजाडताच दोन्ही बाजूने बंदुकीच्या फैरी सुरु झाल्या, भागोजीचा एकएक साथीदार खाली कोसळत होता .
सकाळी उगवलेला सुर्य मावळतीला चाला होता,
पण निकराने झुंजणार्या भागोजीचा पराक्रम पाहत होता,
एका गोळीवर भागोजीचपण नाव लिहिलं होतं,
तिनं तिचा वेध साधला होता.
बेटावरुन होणारा गोळीबार आता शांत झाला होता,
आदिवासींचा वाघ गोदातिरी धारातिर्थी पडला होता .
तो दिवस होता ११नोव्हेंबर१८५९
अशा पराक्रमी आदिवासी विरास विनम्र अभिवादन.....
No comments:
Post a Comment