तुंग किल्ला..
Tung Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील
आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स
च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की,
किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच
सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग
म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर
नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून
लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.
इतिहास :
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही.
मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत
हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये
या भागाच्य सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली.
जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५
रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण,हे
किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८
जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत
ह्या परिसराचा ताबा घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडमाथा फारच
आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून
गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५
ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच
अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत
अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे.
येथून आतं शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे
गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक
आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर
तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे.
यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतुत २ ते ३ जणांची राहण्याची सोय
होऊ शकते. अशा प्रकार एक दिवसात किल्ला पाहून
लोणावळ्याला परतता येते.
गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाणाऱ्या सर्व
वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर
जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान
असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.
तिकोणा किल्ला
गडावर आढळणारी इवलीशी फुलपाखरे
गडावर गुहेत असणारे तळजाई देवी मंदिर
गडावरील शंभू महादेवाचे शिवलिंग

No comments:
Post a Comment