Sunday, 9 April 2017

' चेंदरू ' जंगलाचा असली मोगली .


      विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला  पहिला भारतीय " चेन्दरू मडावी "

     एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर असलेल्या आदिवासी मित्रांच्या वाल वर पहायला मिळायचे . फोटो पाहिला कि असं वाटायचं असेल एखाद्या चित्रपटातला म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं . आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली . फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते " दुनिया का असली मोगली " चेन्दरू " अब नही रहा ..! त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला . प्रवासात असूनही नेमका हा "चंद्रु " कोण ? याची उत्सुकता मनाला लागुन गेली . " गुगल " मास्तर च्या वाचनालयात याच चंद्रु विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले " अरे हा "चेन्दरू" तर जगातला एकमेव मोगली " आहे .
भारतातल्या एका आदिवासी गावातला आणि आदिवासी कुटुंबातला लहानसा मुलगा " चेन्दरू " त्याचा एक मित्र वाघ " टेंबू " चंदरू आणि टेंबू च्या मैत्रीने पूर्ण प्रांतात नाव लौकिक मिळवलाच ह्याच मैत्रीने नंतर जगाची सफर केली . स्वीडन येथील आर्ने सक्स्डोर्फ " या चित्रपट निर्मात्याने टेंबू आणि चंदरूच्या मैत्रीवर चित्रपट काढून "ऑस्कर " पुरस्कार मिळवला.जगाने आर्ने सक्स्डोर्फ यांना जगाने कायम आठवणीत ठेवले मात्र ज्या चंदरू ने आर्ने सक्स्डोर्फ यांना जागतिक ओळख दिली त्या चंदरूला भारतातच कुणी ओळखत नव्हते . चंदरूची आठवण भारतीयांना झाली तेंव्हा मात्र चंदरू जग सोडून गेला होता .
जगातली सर्वात मोठी आणि महान असलेल्या आदिवासी संस्कृतीत चंदरू चा जन्म झाला होता . डोंगर ,दऱ्या ,आणि नद्यांनी वेढलेल्या बस्तरच्या जंगलांनी त्याचे पालनपोषण केले . जंगल हि आदिवासींची आई आहे तर त्या जंगलात राहणारे सर्वच प्राणी भाऊबंध मानतात . आपल्या दिवसाची सुरुवात त्यांच्याकडून जंगलाची पूजा करून होते . जंगल आणि आदिवासींच्या या नात्याला ओळख दिली ती बस्तर च्या जंगलातील चंदरू याने . चंदरू चे वडील आणि आजोबा खूप चांगले शिकारी होते . शिकारीसाठी रोज जंगलात जावे लागे , अश्याच एक दिवस त्यांनी त्यांनी चंदरू साठी एका मोठ्या टोकरीत वडील आणि आजोबांनी भेट आणली . चंद्ररूला टोकरी उघडायला लावली . नक्कीच एखाद्या मोठ्या जनावराचे चवदार मटन असणार या उद्देशाने आनंदाच्या भरात चंदरूने टोकरी उघडली त्यात त्याला वाघाचंलहानसं गोंडस पिल्लू दिसलं .चंदरू वाघाचं पिल्लू हातात घेतलं आणि वाघाच्या व माणसाच्या मैत्रीच्या एका अतूट धाग्याची गुंफण तयार झाली .प्राणी आणि मानवाच्या मैत्रीची सुरुवात झाली . चंदरू चंदरुची बहिण आणि टेंबू एकत्र एकाचा पत्रावळीवर जेवण करायचे . वाघाने माणूस मारल्याचे अनेक वेळा वाचले मात्र वाघाने माणसासोबत बसून माणसाच्या पंगतीतले जेवण खाल्ल्याची जगातली हि पहिलीच घटना असावी . टेंबू मोठा झाला होता त्याच्या खाण्यात वाढ झाली होती . चंदरू टेंबूसाठी मोठमोठे मासे मारून आणायचा . टेंबू मोठ्या थाटात ते मासे खायचा . अश्या या निर्मळ मैत्रीची चर्चा कशी कुणास ठाऊक साता समुद्रापार गेली एक दिवस बस्तरच्या या जगलात चंदरू च्या घरासमोर गोऱ्या लोकांच्या गाडयांचा ताफा येऊन थांबला . मोठमोठ्या मशीन ( कॅमेरा )घेऊन आलेल्या लोकांनी चंदरू ला घेऊन चित्रपटाचे शूटिंग सुरु केले . चित्रपटाचे नाव होते " दि जंगल सागा " बस्तरच्या जंगलातील आदिवासींना घेऊन चित्रित केलेल्या या चित्रपटाने जगभरात धुमधडाका करून टाकला होता जगभरात चंदरू हिरो झाला होता . त्याला बघायला लोक उतावळे झाले होते . भारतात मात्र या गोष्टीची भनक देखील नव्हती . चित्रपटात २ रुपये रोजाने काम करणारा चंदरू सुपरस्टार झाला होता .बस्तरच्या जंगलातील माडिया गोंड या आदिवासी जमातीचा हिरो " चंदरू मडावी " . जगभर लोकांनी या फिल्म ला डोक्यावर घेतले होते आता लोकांना या फिल्म मधील हिरो ला भेटायचे होते , जवळून अनुभवायचे होते .लोकांच्या आग्रहाखातर आर्ने सक्स्डोर्फ यांनी चंदरूला स्वीडन ला नेले स्वीडनला तिथे काळा हिरो म्हणून संबोधले गेले . चंदरू एक वर्षभर आर्ने सक्स्डोर्फ यांच्या घरी राहिला . वर्षभर स्वीडन च्या लोकांनी चंदरू ला पाहिले आणि चंदरू ने स्वीडनचे दर्शन केले . फिल्म आणि दिग्दर्शक चंदरू च्या छायेत श्रीमंत झाले होते मात्र चंदरू तसाच रिकाम्या हाताने मायभूमीत परत आला .फिल्म च्या लोकप्रीयतेचा एक चहरा " टेंबू " काही दिवसातच जग सोडून गेला . चंदरूने बस्तर च्या आदिवासी परंपरेनुसार आयुष्याच्या मार्गावरचा जोडीदार " घोटुल " मध्ये निवडून लग्न केले . स्वप्नाच्या दुनियेतून चंदरू बाहेर आला होता आता त्याला पोटाची खळगी भरायला धडपड करावी लागत होती संघर्ष करावा लागत होता. चंदरू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कच्च्या कुडाच्या घरात राहिला .जगात हिरो ठरलेल्या चंदरूची दि जंगल सागा हि फिल्म ४० वर्षांनंतर बस्तरच्या आदिवासींनी पाहिली .चंदरूच्या बायकोला अजूनही वाटत नाही कि आपला नवरा कधी सुपरस्टार होता . ४० वर्षानंतर गावातील व परिसरातील लोकांनी फिल्म पहिली मात्र चंदरू ती फिल्म पाहू शकला नाही कारण त्यावेळी चंदरू जुना आठवणीत गरीबीचे ओझे पाठीवर घेऊन अंधारात रडत बसला होता . माणसाच्या आणि प्राण्याच्या मैत्रीचा आदर्श नमुना ठरलेला आणि चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहचलेल्या चंदरूला आजारपणात उपचारासाठी न्यायला देखील पैसे राहिले नाहीत शेवटी १८ सप्टेंबर २०१३ ला या आदिवासी सुपरस्टार आणि जगातल्या एकमेव मोगलीने जगाचा निरोप घेतला . कुणी आपला शेवटचा श्वास घेतला तर त्याच्यासाठी श्रद्धांजली वाहणाऱ्या लोकांची स्पर्धा लागते मात्र ६० वर्षे अगोदर वाघाच्या आणि माणसाच्या मैत्रीचा संदेश जगाला देणाऱ्या चंदरू बद्दल कुणी साधा एक शब्दही काढला नाहीकि कुणाला सार्वजनिक श्रद्धांजली वाह्ण्यासाचीहि गरज वाटली नाही . प्रदिद्धी मिळवून देखील दारिद्र्याने त्याची पाठ सोडली नाही .करोडो डॉलर आणि शेकडो पुरस्कार मिळवणाऱ्या फिल्म चा हिरो शेवटी उपवाशीपोटी जग सोडून गेला . फक्त तो आदिवासी होता म्हणून ...उच्चवर्णीय असता तर भारत सरकार त्याच्या घरी पुरस्कार घेऊन गेलं असत . आता मात्र अनेक राजकारण्यांना चंदरूचा साक्षात्कार होतोय तोही स्वार्थी हेतूने .

No comments:

Post a Comment