Thursday, 15 May 2025

ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

            भंडारदरा धरण उभारणीस यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशकालीन धरणाचा पाठीचा कणा आजही ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे.


अवघे ८४ लाख रुपये खर्चुन हे धरण १९२६ ला पूर्ण झाले. आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात धरणाची उभारणी झाली.


१८७५ मध्ये श्रीरामपूर-राहाता भागात पाण्यासाठी कालवे झाले. त्या पाटाला पाणी मिळावे म्हणून संगमनेर तालुक्यात ओझर येथे १८८५ ला पिकअप वॉल बांधण्यात आली.


१९०५ ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० ला भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली आणि विल्सन डॅम १९२६ ला पूर्णत्वास गेला.


त्यावेळी साधन सामग्री फारशी नसतानाही केवळ १६ वर्षात १० हजार ८६ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे दगडी धरण तयार झाले.


४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या धरणाच्या भिंतीची उंची २७८ फूट असून केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत.


२३ हजार ७७ हेक्टर सिंचन- क्षमतेच्या भंडारदरा धरणाची आधी कालवे मग धरण अशी ख्याती आहे.- ओझर उन्नेय बंधाऱ्यापासून पुढे डावा कालवा ७६ व उजवा कालवा ५३ किलोमीटर लांबीचा आहे.- १९७३ ला भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले.- त्यात १३१ बोअर घेऊन शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे ५४० टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे.- १९४ बोअर घेऊन त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे.- केबलचे वजन २१० टन व लांबी १० हजार ५५३ फूट आहे.- बळकटीसाठी १४ बटरेस बांधण्यात आले आणि स्पील वे गेट बसविण्यात आले.- यातून प्रति सेकंदाला ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते.

 स्वित्झर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह- सह्याद्रीचा काळा पाषाण बेसॉल्ट खडकावर ८५ मीटर उंचीचा ११०३९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा कवेत घेऊन धरण दिमाखात उभे आहे.- स्वित्झर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह बसवून सिंचन मोऱ्या तयार केलेल्या आहेत.- येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रिक टन इतकी आहे.- बुडीत पाणलोट २१ किलोमीटर लांब असून जवळपास ६० मीटरपर्यंत पाण्याचा दाब असतो.- पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो.- केवळ ४० टक्के दाब हा भिंतीवर येतो, असे इंजिनिअरिंग तंत्र या धरणासाठी वापरण्यात आले आहे.- कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी साम्रदजवळ ३५० मीटर लांबीचा सॅडल डॅमही बांधला आहे.

       ३९ गाण्यांचे चित्रीकरण- १९४० पासून १०४ चित्रपटांचे व ३९ गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा, रंधा परिसरात झाले आहे.- तुफानी, १९८५ ला गाजलेल्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातील 'तुझे बुलाये ये मेरी बाहे.. 'सह इतर गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा धरणाच्या बागेत प्रसिद्ध अम्ब्रेला फॉलजवळ झाले.- अभिनेत्री मंदाकिनी यातून रुपेरी पडद्यावर झळकल्या.- धरणभिंतीच्या पायथ्याला असलेल्या या बागेत 'सजनी ग भुललो मी, काय जादू झाली' हे भिंगरी या मराठी चित्रपटातील सुषमा शिरोमणी व विक्रम - गोखले यांच्या अभिनयात साकारलेले गीत आजही अनेकांच्या ओठी आहे.- कुर्बान, प्रेम या सिनेमांचे चित्रीकरण, तसेच ये धरती चाँद सितारे हे गीत रंधा धबधब्याजवळच चित्रित झाले.

Thursday, 15 December 2022

१ दिवस, २२ किलोमीटर, १ किल्ला आणि महाराष्ट्रातील २ उंच शिखरे: शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव

१ दिवस, २२ किलोमीटर, १ किल्ला आणि महाराष्ट्रातील २ उंच शिखरे: शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव

पुण्यावरून निघून रात्रभर प्रवास करून पहाटे साडेतीनच्या दरम्यान आम्ही शिरपुंजे या गावातील एका ग्रामस्थांच्या घरी पोहोचलो. आजूबाजूचे गर्द जंगल, अंधार आणि परिसरात वावर असलेले हिंस्र प्राणी यामुळे आम्ही गाडीमध्येच झोपून राहिलो.

साधारण पहाटे पाचच्या दरम्यान गाडीतून उतरून फ्रेश झालो, नाष्टा केला आणि शिरपुंजाचा भैरवगड या आमच्या पहिल्या ट्रेक कडे प्रस्थान सुरू केले. शिरपुंजाचा भैरवगड हे त्या परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत. त्या दिवशी रविवार होता. रविवारी खंडोबाचे दर्शन होणे माझ्यासाठी एक अलभ्य लाभच.दोन महिन्यांपूर्वी इथे जत्रा झाली होती. जंगलातील हिरव्या झाडीमध्ये पिवळ्या, पांढऱ्या, केशरी रंगांनी सुशोभित केलेले प्रवेशद्वार खुलून दिसत होते.

प्रवेश्वराच्या पायऱ्यांनी पुढे आमचा ट्रेक चालूझाला काही ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या, तर काही ठिकाणी अंगावर येत असलेली चढण यामुळे सकाळच्या गारव्यात देखील घाम फुटत होता. संपूर्ण ट्रेक हा चढणीचाच होता. आम्ही पुढे सरकत होतो. आजूबाजूचा परिसर आणखीनच मोहक वाटतो आणि पुढे काय आहे ? या कुतूहलतेने आम्ही आपोआपच गड सर करू लागलो.

आम्ही निमुळत्या खिंडीत पोहचलो. खिंडीत पोचल्यावर डाव्या बाजूला भैरवगडाकडे जाणाऱ्या पायऱ्या तर उजव्या बाजूला घनचक्कर कडे नेत असलेला लोखंडी पायर्यांनी लक्ष वेधून घेतले.

आम्ही डाव्या बाजूला असलेल्या भैरवगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. भैरवगडाची उंची समुद्रसपाटीपासून ११४५मी. जवळपास २५०० वर्षे जुना असा हा किल्ला. प्रचंड मोठे पठार, पाण्याची टाकी, खांब टाकी, भैरोबाचे मंदिर, वीरगळी, गडावरून दिसणारे कळसुबाई च्या कुशीत वसलेले इतर किल्ले, घनचक्कर, गवळदेव यासारखे ठिकाणी सहज नजरेस पडतात. वातावरणामध्ये धुक असल्याकारणाने किल्यांच्या रांगा तितक्या स्पष्ट दिसत नव्हत्या. जरा डोळे मोठे करून या सर्व रांगा आणि कळसुबाई शिखराचे सोबती पाहण्याचा प्रयत्न मात्र मनापासून चालू होता.

भैरवगड या किल्ल्यावर अनेक अवशेष आहेत. माथ्यावर दोन मोठ्या गुहा आहेत ज्या एका गुहेत भगवान भैरवनाथाचे मंदिर आहे, तर  दुसरी गुहा निवासासाठी वापरली जाते.

गुहेतील मूर्ती अतिशय उत्तम कोरीव रंगकाम केलेली असून गावकऱ्यांनी तिची देखभाल केली आहे.

जराशी विश्रांती घेऊन आम्ही गड पाहण्यासाठी निघालो. प्रचंड मोठे पठार, पाण्याची टाकी त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे 'खांब टाक,  टाक्यांमध्ये आम्हाला पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळालं.  त्यानंतर पुढे जाता तिथे अनेक विरगळ पाहायला मिळाल्या. एका गुहेत भैरोबाचे मंदिर आहे.  गुहेमध्ये असलेल्या भैरवाची मूर्ती साजेसी आणि आकर्षक आहे. भैरोबाचे दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. समोरच्या बाजूलाच आणखीन एक भली मोठी विरघळ बघण्यास मिळाली. नीट पाहिले असता असे दिसते की त्यावर चंद्र आणि सूर्य शिळे मध्ये कोरलेले आहेत.तसेच वरच्या बाजूला दोन कोरलेली फुले, हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेला वीर लढत आहे. किंबहुना त्याच्या चेहऱ्यावरील भाव देखील अनोखे आहेत.

सकाळी आठच्या सुमारास आम्ही तिथून परतीला निघालो.आम्हाला  पुढे अजून बराच पल्ला गाठायचा होता. त्याच खिंडीत उतरलो. आता समोर असलेल्या घनचक्कर कडे नेत असलेल्या जिन्यावर आम्हाला चढायचे होते. लोखंडी जिन्याचा आधार घेत आम्ही घनचक्कर चा रस्ता पकडला. विस्तृत पसरलेले पठार, कारवीची कमरे इतकी वाढलेली झाडी आणि कळसुबाईच्या कुशीतील दूर दूर पसरलेल्या डोंगर रांगा यामुळे आपण काहीतरी विलक्षण करतोय असे पदोपदी भासत होते. काही अंतर चालून गेल्यावर आम्ही एका घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला.  इथे नक्कीच मोठा पाण्याचा प्रवाह पावसाळ्यामध्ये वाहत असावा अशा काही खुणा त्या तिथे  स्पष्ट दिसत होत्या. त्याच ठिकाणी आम्ही थोडावेळ थांबलो विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा घनचक्कर कडे चालायला लागलो. काही वेळातच आम्ही घनचक्करच्या माथ्यावर पोहोचलो. समुद्र सपाटीपासून साधारण १५३२ मीटर उंचीवर आम्ही होतो. तिथून मुडा, रतनगड यांसारखे सह्यसोबती  जवळ भासत होते. घनचक्कर हे कळसुबाईच्या रांगेतील एक सुंदर असे हे शिखर. तिथे थोडावेळ थांबलो खोल असलेल्या भव्य दरीचा आनंद घेतला. सुरक्षिततेचे भान ठेवून काही फोटो काढले. थोडीशी पूजा देखील केली. अकरा वाजले होते. **आता आम्हाला आमचे उद्दिष्ट गाठायचे होते ते म्हणजे गवळण. **काही वेळातच आम्ही गवळदेवसाठी  निघालो.

हिवाळा असला तरी आता ऊन डोक्यावर येत चालले होते. आम्हाला गवळदेव कडे जाण्यासाठी पूर्ण घनचक्कर उतरून खिंडीत उतरलो. उतरून समोर असलेल्या गवळदेव शिखराच्या डाव्या बाजूची म्हणजेच दरीच्या बाजूकडील वाट धरली. शिखर जरी समोर दिसत असले तरी संपूर्ण वेढा घालून मागच्या बाजूने माथा गाठायचा होता.  **गवळदेव हे १५२२ मीटर उंची असलेले हे महाराष्ट्रातील तीन क्रमांकाचे उंच शिखर. उंची गाठायला मेहनत ही तितकीच!**

घनचक्करचा डोंगर डाव्या हाताला ठेवून आम्ही **गवळदेव** ला पूर्ण ट्रॅव्हर्स  मारून त्याच्या मागच्या बाजूला गेलो. शिखराच्या ट्रेक रूटवर आम्हाला फक्त एकमेव पानवठा दिसला. त्यापाणवठ्याच्या  बाजूला असलेल्या चिखलात प्राण्यांच्या पंजाचे ठसे उमटले होते. त्यावरून त्या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर आहे हे स्पष्ट कळून येत होते आणि पाणी प्यायला सर्व पशु याच ठिकाणी येत असावेत यात काही शंका नव्हती. त्यात आमचा देखील सहभाग होता. गवळदेव - महाराष्ट्रातील कमी ज्ञात आणि ऑफबीट शिखर… ४५६६ फूट उंचीवर असलेले काळसुबाई नंतरचे अधिकृतपणे तिसरे सर्वोच्च शिखर तुम्हाला भंडारदरा प्रदेश आणि आजूबाजूच्या पर्वतांचे संपूर्ण विहंगम दृश्य माथ्यावरून घडवते.

अवघ्या  दोन तासाच्या डोंगरयात्रेनंतर आम्ही गवळदेव च्या झेंड्यापाशी नेणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर पोहचलो. काहीसा दगडांचा आधार घेऊन जरासे क्लाइंबिंग या ठिकाणी अनुभवायची संधी मिळाली. तो लहान टप्पा पार करून पुन्हा एकदा छोटीशी टेकडी ओलांडायची होती. पावलं आता झपझप पडत नव्हती.  मात्र मन पळत होत. पांढऱ्या झेंड्याकडे प्रस्थान करून अखेर गवळदेवाच्या मंदिरासमोर आम्ही नतमस्तक झालो. गवळदेवाचे वैशिष्ट्य म्हणजे या देवाला शेंदूर लावत नसून चुना लावतात आणि त्यामुळे अगदी दुर्मिळ अशी गवळदेवाची मूर्ती पाहायला मिळाली.

दुपारचा एक वाजला होता जेवढे अंतर आम्ही परत आलो होतो तितकेच आम्हाला पुन्हा परत जायचे होते म्हणजे साधारण बारा किलोमीटर एक मार्गी प्रवास झाला होता आणि तितकाच प्रवास पुन्हा जाताना करायचा होता. वेळेचे भान ठेवून आम्ही अवघ्या काही मिनिटात मध्येच आमचा आनंद तिथे साजरा केला. जवळ देवाच्या माथ्यावरून अग्निबाण या कात्राबाईच्या कुशीतील सुळक्याचे, रतनगड, हरिश्चंद्रगड या भव्य किल्ल्यांचे दर्शन झाले.

संध्याकाळी ५. ३० वाजता आम्ही पुन्हा शिरपुंजे गावात आलो आणि जेवणावर ताव मारून परतीच्या प्रवासाला निघालो.

Tuesday, 15 November 2022

बिरसा मुंडा


क्रांतिकारी चिंगारी का नाम है बिरसा
दमनकारियों का मुँह तोड़ जवाब है बिरसा
आदिवासियत का कवच है बिरसा
झारखंड को अपने साहस से जगाने वाला वह भगवान है बिरसा
   सन्माननीय व्यासपीठ, आजच्या का अध्यक्ष, वंदनीय गुरुवर्य व माझ्या प्रिय बाल मित्र आणि मैत्रीणींनो! आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते कृपया शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

बिरसा मुंडा हे आदिवासी नेते आणि लोकनायक होते. सध्याच्या भारतात रांची आणि सिंद्यभुमचे आदिवासी बिरसा मुंडा यांना 'बिरसा भगवान' म्हणून लोक स्मरण करतात

 बिरसा मुंडा यांनी मुंडा आदिवासीना बिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध उभे करून हा सन्मान मिळवून दिला. १९ व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात बिरसा हे एक प्रमुख दुवा ठरले. बिसरा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जिल्ह्यातील उलिहाडू गावात झाला. मुंडा रीतिरिवाजानुसार त्यांचे नाव बिरसा असे ठेवण्यात आले. बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी हातू होते. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब रोजगा राच्या शोधात उलिहाडू ते करूंबडा येथे स्थायिक झाले जेथे ते शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुन्हा कामाच्या शोधात मुंबईला गेले. बिरसा लहान- पणापासून मित्रांसोबत वाळूत खेळायचा आणि मोठे झाल्यावर त्याला मेंढ्या चरायला जंगलात जावं लागायचं. जंगलात मेंढ्या चरताना वेळ घालवण्यासाठी ते बासरी वाजवायचा काही दिवस बासरी वाजवण्यात तो पारंगत झाले. त्यांनी भोपळ्या पासून "तुइला" हे तंतुवादय बनवले. जे ते वाजवत असत. त्यांच्या आयुष्यातील काही रोमांचक क्षण आखाडा गावात त्यांनी घालवले.

या गरिबीच्या काळात बिरसा यांना शिक्षणासाठी त्यांच्या मामाच्या गावी आयुमत येथे पाठवण्यात आले. बिरमा दोन वर्षे आयुभातूमध्ये राहून तेथे शिकायला गेले. बिरसा अभ्यासात खुप हुशार होते, त्यामुळे शाळा चालवणाऱ्या जयपाल नाग यांनी त्यानां जर्मन मिशन स्कुलमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले, ख्रिश्चन शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी धर्म बदलला आणि त्यांचे नाव बदलून बिरमा डेव्हिड उनसे ठेवले.जे नंतर बिरसा दाऊत असे झाले. बिस रांच्या आयुष्यात नवे, वळण आले ते स्वामी आनंद पांडे यांच्या संपर्कात आले आणि हिंदू धर्म आणि महाभारतातील पात्रांशी त्यांची ओळख झाली.

वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा.सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाचा इंग्रज अधिकारी, ठेकेदार, जमीनदार, सावकार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला व  बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले " आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही.आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू.. या आंदो- लनाला 'उलगुलान' असे म्हटले गेले. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षीस जाहीर केले. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.

9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.

शेवटी जादा जाता एवढेच बोलेन..

धैर्याने आणि शौर्याने तू.

देशाच्या अस्मितेचे दिले भान

धरतीचा देव तू, 

देशासाठी दिले बलिदान...

Tuesday, 4 October 2022

सह्याद्री तील पुष्पोत्सव

कारवी बहर: सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान


कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू नये. एवढेच काय तर डोंगर उतारावरून मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत उभी असतात ती हीच कारवीची झाडे. कारवीची मुळे जमिनीत अशी काही जाळी गुंफतात, की वाऱ्या-पावसामुळे होणारी जमिनीची धूप आटोक्‍यात येते. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळे पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्थर वाढवण्यास हातभार लावतात. याच कारवीच्या दाट जाळीच्या आश्रयाला वाढतात अनेक ऑर्किड (ground orchids) आणि लिली (lilies) ज्याचे गुरांपासून संरक्षण करते ही करावी. कारवीची पाने जनावरांच्या चाऱ्यास उपयोगी पडतात. तर अनेक कीटकांना खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते ते याच कारवीच्या झुडपांवर. या कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचे (mass flowering) एकत्रित बहर, सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा.
ही झाडे सलग सात वर्षे वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्‍या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात. भंडारदरा भागात आदिवासी लोक हा कारवीचा मध गोळा करतात. अधिक दाट आणि गडद रंगाच्या या मधाची बाजारात चढ्या भावाने विक्री होते. कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या (pollination) परागीभवना/ परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्यक्षरीत्या का होईना; पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरला, की कारवीची बोंडे सुकू लागतात. या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते. बोंडामधील बिया पक्व झाल्या, की जीवन चक्रातील महत्त्वाची म्हणजेच प्रजननची आपली जबाबदारी पूर्ण केलेली ही झाडे आठ वर्षांची तपश्‍चर्या पूर्ण करून कृतज्ञतेने आपला जीवनकाळ संपवतात. जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने ही बोंडे तड तड आवाज करत फुटतात आणि त्या झटक्‍याने आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात. कारवीच्या (mass flowering) एकत्रित बहरचा मुख्य हेतू बिया खाणाऱ्या कीटकांपासून बियांचे संरक्षण. (mass flowering) एकत्रित बहरामध्ये इतक्‍या बिया विखुरल्या जातात, की भलेही काही बिया कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडल्या, तरी नव्या फुटीसाठी मुबलक बिया शिल्लक राहतात. हाच फंडा नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, वणवा यामुळे होणाऱ्या नुकासानालाही लागू पडतो. कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठी करतात. एवढेच काय तर कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीदेखील वाढतात. अशा या बहुपयोगी कारवीचा दर आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा असा हा आगळावेगळा पुष्पोत्सव मन भरून पाहण्याची माझी अनेक वर्षांपासूनची तीव्र इच्छा या वर्षी पूर्ण झाली.
फोटो सौजन्य .प्रवीण इदे

Tuesday, 16 August 2022

कोळी महादेव जमातीचे मूळ वस्तीस्थान

निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात म्हणजेच वर्तमान अमरावती महसूल विभागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात ही जमात प्रामुख्याने आढळते. तसेच सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर, खानदेश,सोलापूर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमाती असून ते सुद्धा निजामांच्या देशातून आल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ –IMPERIAL GAZETTEER OF INDIA VOL-XV)

कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात.
Sppplemenary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.
वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९  टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.
वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही  हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते-  पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी   टेकडी  हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे-  महादेव किंवा पचमढी   टेकडी  या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव  पडले-  (संदर्भ- The Tribes And castes of the   Central Provinces of India-1916)
महादेव किंवा पचमढी टेकडी या ठिकाणी मोठा महादेव, छोटा महादेव, गुप्त महादेव आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतात आहे. याच भागाला लागून अमरावती जिल्ह्यात  मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर सालबर्डी हे धार्मिक स्थळ महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत. महादेव महाराज देवस्थान आहे.
तसेच अमरावती जिल्ह्याला लागून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.
तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरु आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील  महादेव किंवा पंचमढी  टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी  हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान  आहे.

Tuesday, 9 August 2022

जागतिक आदिवासी दिन


*पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली, तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.*

*जगात समाज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. १९ व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून २४ ऑक्टोबर १९४५ या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला.*

*संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या १९२ इतकी आहे, ते एकत्र आले. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल ५० वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती.*

*जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली.*

*जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामध्ये एकूण २२ भाग, १२ अनुसूची व ३९५ अनुच्छेद आहेत. यामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मुख्य अनुच्छेदामध्ये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.*

*अनुच्छेद ३६६ मध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा नमूद केलेली आहे.*

*अनुच्छेद ३४२ मध्ये संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात राहत असलेल्या अनुसूचित जमातीची यादी घोषित करण्यात आली आहे.*

*अनुच्छेद ३४१ (१)मध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासनासंबंधी व त्याचे नियंत्रण यासंबंधी तरतुदी आहेत.*

*अनुच्छेद २४४ (१) ५ मध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असलेल्या कायद्यासंबंधी स्पष्ट तरतूदी आहेत. अर्थात भूमि अधिग्रहण व हस्तांतरण, बँकीग व्यवस्था, प्रशासन व्यवस्था इत्यादी प्रशासकीय बाबी गैर आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त आहेत.*

*अनुच्छेद २४४ (१) अंतर्गत ७३ व्या घटना दुरुस्तीद्वारे पाचवी अनुसूची अंतर्गत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींनी आदिवासींची सांस्कृतिक सामाजिक स्वायत्तता जतन करणारा पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी जारी करुन अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार बहाल केला आहे. शासकीय यंत्रणा, निर्वाचित सदस्य आणि आदिवासी यांच्या सहयोगाने या कायद्याच्या अंमलबजावणीतून आदिवासींच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो.*

*आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजाच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्यांतर्गत सामाजिक हित, रुढी परंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास, तसेच सामुहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपआपसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही इतके पंचायत राज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण यामध्ये सरपंच पदाचे आरक्षणसुद्धा अंतर्भूत आहे.*

*जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी/गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन, इत्यादी तरतूदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत.*

*अनुच्छेद १४ मध्ये समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. यासाठी अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ लागू करण्यात आलेला आहे.*

*अनुच्छेद १६ (४) अनुसूचित जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. अनुच्छेद २३ मध्ये मानवी व्यापार व जबरदस्ती काम करवून घेणे याविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी विशेष तरतूद आहे. अनुच्छेद ३३० मध्ये विधानसभेत व ३३२ मध्ये लोकसभेत अनु.जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.*

*आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करुन हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासी बहूल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करुन दिली जात आहेत. केवळ इतके करुन होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरु झाले आहे.*

*याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.*

*कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल.*


Monday, 1 November 2021

बहिरोबाची वाट | कोथळ्याचा बहिरोबा | कोथळीगड

आज बहिरोबाची वाट असल्यामुळे कोठळीगडावर बहिरोबा चे दर्शन घेऊन , गडाची सफर करण्याचा सुवर्ण योग जुळून आला .
बहिरोबा देवस्थान
दुसऱ्या शिडीनंतर डाव्या बाजूला कपारीत कोरलेला थंड व शुद्ध पाण्याचा साठा
गडद
शिडी पार करताना सोबत मधुकर भांगरे सर व जालिंदर गभाले सर
गडावरून खाली दिसणारे कोथळा गाव

वाघबारस

आदिवासींचा वाघदेव...

आदिवासी निसर्गाची पूजा करणारे... आदिवासींची संपूर्ण जीवनपद्धती जंगलांवर आधारित... आदिवासींची पूजा-अर्चा झाडांना, प्राणीमात्रांना वंदन करणारी...
महाराष्ट्रातील आणि जगभरातील सर्व आदिवासी समाजातील साऱ्याच जमाती वंशपरंपरेने वनदेवता, वन्य पशु-प्राणी यांचे पूजन करत आल्या आहेत. भिल्ल, कोकणा, पावरा, वारली जमातीत ‘वाघदेवा’चे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील बहुतेक आदिवासी भागांमध्ये ‘बापदेव’, ‘वाघ्यादेव’ म्हणून ही वाघदेवाचा उल्लेख केला जातो. गावाला, गावातील गुराढोरांना, लोकांना आणि पोराबाळांना वाघाने त्रास देऊ नये. म्हणून त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी त्याची पूजा केली जाते. गावाच्या वेशीवर वाघदेवाची स्थापना केलेली असते. आदिवासी रानावनात जन्मतो, तेथेच लहानाचा मोठा होतो म्हणून जंगलातील प्राणी, हिंस्र पशु यांनाच तो देव मानतो, त्याचीच मनोभावे पूजा-अर्चना करतो. वाघापासून संरक्षण व्हावे म्हणून आदिवासी मोठ्या आनंदभावाने त्याचा सण साजरा करतो. 
जंगलामध्ये वाघ, तरस, माकड, खार ,रानमांजर ,ससा, मुंगुस ,सियार सारखी जंगली श्वापदे आढळून येतात. प्रत्येकाला अनुसरून वर्षाच्या निरनिराळ्या ऋतुचक्रात त्यांचे पूजन केले जाते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच मक्याचे/मकईचे पीक तयार झाल्यावर वाघदेवाची पूजा ही प्रत्येक गावाच्या सोयीनुसार करण्यात येते. पिके तयार होत आल्याने शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतावर जावे लागते. जंगलात नेहमीच वाघाची दहशत असते. त्यांच्यापासून साऱ्यांची रक्षा व्हावी, आपणास त्रास होऊ नये म्हणून वाघ्यादेवाची विधिवत पूजा केली जाते, यावेळी भंडारा दिला जातो. गावातील माणसे वाघाचे सोंग घेतात, त्यांना सामुदायिकरित्या पिटाळून लावले जाते. गावातील एकूण एकाने या कार्यक्रमासाठी हजर राहावे, असे रूढीचे बंधन असते. सगळ्या गावाची शेतीची कामे या दिवशी बंद ठेवलेली असतात.
#वाघदेव #वनदेवता #बापदेव #वाघ्यादेव #देवपूजा #प्राणी #झाडे #निसर्ग #जंगल #आदिवासीविकासविभाग

Friday, 14 May 2021

अक्षय तृतीया (आखाजा)

🌱🌾🌿 *आखातीचा सन आनी त्यामागील रहस्य....!* 🌾🌿🌱

  " आदिवासिंच्या सन(उत्सव) पैकी विशिष्ट रितीरिवाज पध्दतिने  मोठया उत्साहात साजरा केला जानारा सन म्हनजे *"आखाती"* होय. *केवळ  उत्सव म्हनुनच नव्हे तर त्याच्यामागील ऐतिहासिक रहस्य आहे.* पुर्विचा समाज हा खेडयापाडयांचा होता .लोकसंख्या मुबलक प्रमानात होती.निसर्गाचा समतोल & पाऊस वेलेवर पडत होता .निसर्गातील बदतलते चक्र बघुन पारंपारिक तर्कपध्दतिने शेती कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हनजे आखातीचा उत्सव सांगता येईल. *विशेष म्हनजे अभ्यासकांनाही याची कल्पना नसेल त्याच्याही कित्येक वर्षापासून पारंपारिक शेती मात्र प्रायोगिक पद्धतिने कल्पना मांडनारा आदिवासी समुदायात दिसुन येत आहे.* देशात शेतीवर आधारित विविध शोध घेतले गेलेले आहेत.मात्र गवराईच्या सनामागील जे रहस्य दडलेले आहे ते *काल्पनिकतेवर* आधारित नसुन आजही *वास्तविक* आहेत.
आज या समाजातिल उच्च शिक्षण घेतलेल्या वर्गाने विविध शोध घेउन M.Phil, PHD, च्या पदव्या मिलविलेल्या आहेत.याचा अभिमान वाटतो.विशेष म्हनजे सुशिक्षित युवा वर्गाने या बाबीकडे लक्षपूर्वक बघायला हवे.

 *सनाची सुरवात-* आखातीचा (गवराई) सन येन्याच्या 15 दिवसा अगोदर लाल, काळया  (चिकार) माती आनुन एका टोपलीमध्ये ठेवतात.मातिचा चुरा करून त्यामध्ये विविध प्रकारचे धान्य पेरले जातात.रोज सकाळ संद्याकाली नविन पान्याने गवराईला पानी घालतात. संद्याकाळच्या वेळेत  गावातील स्रीया एकत्र येऊन गवराईचे  गाने गातात....!
जसे की,
*आमच्या गवराईला एकच पान बाई... एकच पान..!*

असा ह्या लोकगितांचा  प्रकार दररोज म्हटले जाते.गवराईचे गाने म्हनजे मानवी मनाला एक चेतना निर्माण करनारी आहे.
*धान्याचे प्रकार:-* नागली, ऊडीद,मका,ज्वारी,वरई, अशा प्रकारचे विविध धान्य पेरले जातात. लोकांची भावना अशी की, *"ह्या वर्षात डाह्या मग का  पातलत्याय?* अर्थात एकप्रकारे वातानूकुलित आधारावर शेती कशी असावी.याचीच कल्पना मांडतांना दिसुन येत आहे.

*आखातीच्या दिवसाचा क्षण:-* या दिवशी  मनोरंजनाने बहरून गेलेला असतो.प्रत्येक जन आपापल्या घरी टिपरे बनविन्यात मग्न असतो.टिपरे उठावदार दिसावते म्हनुन रंग  आनी हस्तकलेचे रेखीव बघायला मिळतात. दुपारच्या 3.30 वाजेच्या दरम्यान गावातिल कोतवाल "दवंडी" देतो. ही जुनी प्रथा आजही बघायला मिळते.घराघरातिल स्रीया गवराई घेऊन सामुहिकतेने विहिरिच्या दिशेने वाटचाल करतात.गवराई घेऊन चालनारे पुढे त्यामागे लहान-मोठे मुले - मुली..!

*विहिरी जवळची प्रथा:-* विहिरी नजिक गेल्यावर विहिरिच्या चहुबाजुंनी गवराई ठेवतात.गवराईसाठी *"बोना"* ठेवतात. *"बोना म्हनजे पलसाच्या पानावर भात,डाल,मासे असतात त्याला बोना म्हटले जाते.*

*खजिन्याचा शोध:-*
जेवनाचा प्रकार झाल्यानंतर खजिन्याचा प्रकाराला सूरवात होते.खजिन्याचा प्रकार म्हनजे एक खेळच होय. गावातिल तरुनमुले निसर्गातिल 5 वनस्पती (पाने,फुले)गुपित आनतात.एका खडयात खोदुन ठेवतात.त्याचा शोध स्रीयांनी घ्यायचा असतो.शोध घेन्याकरिता गाने लाऊन एक एक गुपित ठेवलेल्या खजिन्याचा शोध घेन्याचे प्रयत्न करतात.वनस्पती म्हनजेच खजिना शोधल्यास स्रीयांचा विजय ! न शोधल्यास गुपित ठेवलेला खजिना मिळवन्याचा प्रयत्न करतात.

*गावाची कुलदैवत गावदेवी:-* त्यानंतर गावदेविचे दर्शन घेन्यासाठी जातात.तिथे नाचून गाऊन टिपरांचा आनंद लूटतात.टिपरांच्या प्रकारानंतर गावामध्ये ढोलाच्या तालावर आनी गान्याच्या बोलावर आनंदमय गवराईचा सन(उत्सव ) साजरा केला जातो.

   वरिल म्हटल्याप्रमाने, *शेतीवर आधारित अभ्यासकांनी विविध संशोधनात्मक प्रयोग झालेले आहेत.असे असतानाही त्याच्याही खुप वर्षापुर्वी आधुनिक तंत्राचा अभाव असतांना शेतीवर आधारित पारंपारिक पद्धतिने प्रयोगाची सुरवात प्रथमता येथे झालेले असावेत असा प्रश्न निर्माण करून अभ्यासकांना संशोधन करन्यास भाग पाडतो.*
उन्हाला  जान्याचा मार्गावर आनी पावसाळ सुरवात होन्यापुर्वी आखातिचा सन येतो यालाच अक्षय त्रुतिया या नावाने ओळखतात.आदिवासी समुदाय शेतीवर अवलंबुन असल्यामुळे शेतीतील जे पीक  पावसाल्यात घेत असतो ते कसे येतील? त्याच्यावर कोनता परिणाम होईल का?? निसर्गाच्या नियमावर आधारित जे पीके घेतली जातात त्या पींकांना अनुकूल पद्धतिचे वातावरण असेल का??अथवा त्याच्यावर विपरीत परिणाम होईल का? याची एकप्रकारे शहानिशा करन्याचे प्रयोग  करतांना दिसतो आहे.

आज सन(उत्सव ) म्हनजे मनोरंजनचा भाग म्हनुन न बघता कोनत्याही समाजातील संस्कृतीचे दर्शन घडविते.संस्कृतीचे महत्वच त्या  समाजातील अस्तित्वाची  ओळख होय.आदिवासी समाजात विशिष्ठ  (अनोळख्या) रितिरिवाज ,रुढी, परंपरा जपुन ठेऊन  विविध सन बघायला मिळतात.हे उत्सव म्हनजे निसर्गातिल वनस्पती , सजिव,प्राणीमात्राला अनुसरुन आहेत. मात्र अलिकडिल कालात या समाजातिल संस्कृतीतील सन (उत्सव) आनी मनोरंजनात्मक साहित्याचा लोप होत चालला आहे. 
आदिवासी समाज हा भोळे भाबडा असल्यामुळे  त्यांच्यात अनेक प्रकारचे अवैद्न्यानिक ,बुद्धिला न पटनारे,अंधश्रद्दा ,कर्मकांडामुळे स्वताचे अस्तित्व हिरावुन बसला आहे.स्वहिताबरोबर समाज दिशाहिन झालेला आहे. अशावेली त्याचे संरक्षन & संवर्धन करन्याची गरज भासत आहे.

Friday, 2 April 2021

तुळजा लेणी ,Tulja Caves

Tulja Caves, junnar

तुळजा लेणी हा महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातील एक लेणी समूह आहे. शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजूला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ साधारण ३ किलोमीटर लांबीवर एक टेकडी लागते... त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी आहेत.
भारतातील एकूण लेण्यांपैंकी सर्वांत जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्यापैंकीच तुळजा लेणी... तुळजा लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी... ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
या लेण्यांमध्ये असलेला स्तूप हा अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्तूपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट... बाजूलाच बौद्ध भिक्षूंसाठी दगदांतून कोरलेले विहार, भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तूपाची पूजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेण्यामध्ये कोरलेले दिसते. डोंगरावरुरू कोसळणारे धबधब्याचे पाणी थेट लेणीसमोरच पानकोदी(?)मध्ये साठवले जाते. पावसाळ्यात लेण्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. लेण्यांमधून समोर विस्तीर्ण जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला दिसतो.
या लेण्यांच्या अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात. लेण्यांचे व शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर या लेण्यांबद्दल सांगतात की, या लेण्यांच्य निर्मितीचा काळ हा सुरुवातीचा म्हणजे इ.स.पू २३० चा आहे. नंतर तिथे अजिंठ्यासारखे चित्रकलेच्या माध्यमातून जातक कथा व बुद्ध चरित्रातील प्रसंग साकारण्यात आले.

या लेण्यांची प्रसिद्धी हेन्री कुझेनच्या कानावर गेली. मुंबई गव्हर्नर व तो ही लेणी पाहण्यासाठी येणार होते, असा निरोप जुन्नरच्या कलेक्टरला मिळाला. गव्हर्नर येतात म्हणून लेण्यांची साफसफाई करुन घेण्यात आली. वाढलेली झुडपे, कोळिष्टके, पाकोळ्याची घाण काढण्यात आली. ही घटना १९१८ मधील आहे. पाणी टाकून गोणपाट - कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली. जेव्हा गव्हर्नर व हेन्री कुझेन आले... बघतात तर काय? तो हा प्रकार... जे पाहण्यासाठी आले तेच नष्ट झालेले होते. अतिउत्साहापायी व अज्ञानापायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता. झाल्या प्रकारामुळे हेन्री कुझेनत्यांनी कपाळावर हात मारुन घेतला. याबाबतचा तेव्हाचा अहवाल आजही पुरातत्त्व खात्याकडे आहे. 

Tuesday, 16 March 2021

अकोले तालुक्यातील गड किल्ले

अकोले तालुक्यातील दुर्ग...
1. हरिश्चंद्र गड ( पाचनई)
2.रतनगड( रतनवाडी)
3.कलाडगड (पेठेची वाडी)
4.कुंजरगड( फोपसंडी)
5. कोंबडगड ( फोफसंडी)
6. बाळाई गड (सोमलवाडी)
7.पाबर गड (मुतखेल)
8.भैरवगड (कोथळा)
9.भैरवगड( शिरपुंजे)
10. कोतुळचा किल्ला (कोतूळ)
11. ब्राम्हणवाडा भुईकोट (ब्राम्हणवाडा)
12. अलंग
13.मदन
14. कुलंग
15. चेमदेव फोर्ट (खिरविरे)
16.रत्नागिरी दुर्ग (गर्दनी)
17. नाकविंदा फोर्ट (पिंपळगाव नाकविंदा)
18. बीतनगड (बिताका)
19.पट्टा गड (तिरडे)
20.आजोबा गड(कुमशेत)

Thursday, 28 January 2021

पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे

#पद्मश्री_राहीबाई  

राहीबाई या आदिवासी, निरक्षर. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोला तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. असा त्यांचा सुरुवातीचा परिचय. नंतरचा परिचय द्यायला सुरुवात केली की, त्यांना निरक्षर म्हणायला कोणीही धजावणार नाही असे कर्तृत्व !

 काय केलंय या सामान्य बाईनं ?
अवाक व्हायला होतं त्यांच्याविषयी माहिती करून घेतल्यावर आणि विनम्रपणे हात जोडावेसे वाटतात त्यांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी !!!

राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही. 

सध्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात त्यांच्या बियाण्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेले आहे. ती संकरित बियाणे असून त्यांचे yield जास्त असल्याने सर्व शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. दुर्दैवाने commercial सोडा, परंतु घरी वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी हे पारंपारिक उत्पादन घेत नाही. 
आज अशी परिस्थिती आहे की, या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु राहीबाईंनी 'सीड बँक' उभारली असून राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात ५० टक्के शेतकरी हे गावरान बियाणे वापरतात.
विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे.  देशभरातून 'कृषी तंत्रज्ञान' शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा  हा प्रोजेक्ट बघायला येतात. संपूर्ण जगातील हा अशा प्रकारचा एकमेव प्रोजेक्ट आहे.

त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. 
त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारचा गतवर्षीचा ' पद्मश्री ' पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
🙏

Monday, 28 December 2020

शिवकालीन वजने(मापे)

शिवकालीन वजने(मापे)-
 * अठवे- शेराचा 1/8
 * अडशेरि- अडीच शेर
 * अदपाव- अर्धा पावशेर
 * अदमण- अर्धा मण
 * अदशेर- अर्धा शेर
 * अधोली- अर्धी पायली
 * अंजली- ओजळभर पानी
 * आटके- अर्धा शेर
 * आढक- चार शेर, पायली
 * कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
 * कार्त- पाव रत्तल
 * किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
 * कुडव- आठ शेर
 * कुंभ- वीस खंडी
 * कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
 * कोड- खंडी, वीस मण
 * कोळवे- शेराचा अष्ठमांश
 * खारी- 16 द्रोण, एक खंडी
 * गरांव- अर्ध गूंज माप
 * गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
 * गुंज-  एक वजन परिमाण
 * चंपा- दोन शेर धान्याचे माप 
 * चवाटके- छटाक
 * चवाळामण- एक प्रकारचा मण
 * चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
 * चाळीसा- चाळीस शेरांचे माप
 * चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
 * चिपटे- पावशेराचे माप
 * चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
 * चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
 * चोथवा- एक पायली
 * चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
 * चौशेरी- चार शेरांचे माप
 * छटाकी- छटाक
 * छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
 * टवणा- पांच शेरांचे माप
 * टांक- एक तोळा
 * टिपरी- मापी पावशेर
 * टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
 * टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
 * डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
 * डोळा- 16 शेरांचे माप
 * धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
 * धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
 * नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
 * नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
 * नाकटी- दीड पावशेराचे माप
 * नाळके- एक माप
 * निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
 * तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
 * पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
 * पड- मापी 2 शेर, पाउन शेर
 * पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
 * पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
 * पान- पावशेर
 * पाभ- एक प्रकारचे माप
 * पायली- चार शेरांचे माप
 * पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
 * पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
 * पिटके- अदपाव
 * फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
 * बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
 * भरा- धान्याचे एक माप
 * भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
 * भार- आठ हजार तोळे वजन
 * मणखाण- सुमारे एक मण
 * मणका- एक मणाचे माप
 * मापटे- अर्धा शेर
 * मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
 * माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
 * मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
 * मूठ- मुठभर धान्य
 * रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
 * रोवळा- एक माप
 * लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
 * वाल- तिन गूंजाभर वजन
 * वैताद- एक तृतयांश तोळा 
 * शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ 
 * शिरिद- पावशेर
 * शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
 * शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
 * शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
 * साक- एक हाताची ओंजळ
 * सामाशी- सहा मासे वजनाचे
 * सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते

Sunday, 15 November 2020

धरती आबा भगवान बिरसा मुंडा

बिरसा मुंडा (Birsa Munda)

 (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). बिरसा मुंडा हे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला. जन्म गुरुवारी म्हणजे बिस्युतवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव ‘बिरसाʼ ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गावी गेले. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.

बिरसांना शिक्षणाची आवड होती. सुरुवातीला ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात. पुढे बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले (१८८६). तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा आदिवासींबद्दल ठग, चोर, बेइमान इत्यादी शब्दांचा वापर केला. तेव्हा बिरसा यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बिरसांना शाळेतून काढण्यात आले (१८९०).

पुढे त्यांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला. उदरनिर्वाहासाठी ते बांदगाव येथे वास्तव्यास होते (१८९०–९४). त्यांचा विवाह हिरीबाई नामक मुलीशी झाला; परंतु अल्प काळातच तिचे निधन झाले. बिरसा यांनी आनंद पांडे या वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट (Birsaites) धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले, तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली. ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे, अशी लोकजागृती ते करू लागले. त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना ‘सरदारʼ म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. तो ‘सरदारी लढाईʼ म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला. बिरसांनी चालविलेले व्यापक आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी दोन नियम-अटी लागू केले : (१) गावागावांत जेवढ्या आदिवासींच्या जमिनी आहेत, त्यांवर सरकारी वन-अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. या नियमामुळे मुंडा लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावला जाऊन समाजाचे नुकसान होणार होते. (२) इंग्रजांनी अनेक ठेकेदारांना दारूचे अड्डे चालविण्यासाठी परवाने दिले. अशिक्षित मुंडा आदिवासी नेहमी दारूच्या नशेत राहावा, त्यामुळे ते आंदोलनापासून अलिप्त राहतील, असा त्यांचा हेतू होता. बिरसांनी या नियमांना विरोध करत इंग्रजांविरुद्ध आवाज उठविला. आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

१८९४ मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट, इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली.  त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे आदिवासींना अशक्य बनले. जमीनमालकी असणारा आदिवासी भूमिहीन व वेठबिगार बनला. त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचे संघटन केले. समाजबांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे, त्यामुळे आपले राज्य येईल, असे बिरसा सांगत. त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामास जाणे बंद केले. इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहोत, असे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत. बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचे ठरविले. ब्रिटिशांनी  बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले (२६ ऑगस्ट १८९५). बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर ३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसांची सुटका झाली.

कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे ५,००० आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून २५ डिसेंबर १८९९ पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशांतील पोलीसचौक्या जाळण्यात आल्या. या मुक्तीआंदोलनाला मुंडारी भाषेत ‘उलगुलानʼ असे म्हणतात. या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तिरकामठ्यांद्वारे हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले. अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला. बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली.  ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले.

रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे निधन झाले.

बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली. ब्रिटिशांनी ‘छोटा नागपूर टेनन्सी ॲक्टʼ मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले (१९०२). आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा यांची ओळख आहे. रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ :

Chandra, Bipan & others, India‘s Struggle for Independence : 1857 – 1947.

Guha, Ranjit, Subaltern Studies : Writing on South Asian History and Society,  
    Vol. 3, Delhi, 1994.

- संग्रहित from Social media

Thursday, 12 November 2020

गाणी दिवाळीची

आपल्या पुर्वजांनी ठेवलेला पुढील

पिढीसाठीचा अलिखित वारसा मी 

जतन करून ठेवलाय.लहानपणी मी

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलो की

या सणाच्या दिवशी बुजुर्ग माणसां-

बरोबर हि गाणी म्हणत गाय-म्हशी

ओवाळायचो.

         ती गाणी मला जशी आठवली

तशी लिहुन काढली आहेत.आपणही

दिवाळीला आपल्या मुलांबरोबर ही

गाणी म्हणत गाय-म्हशी ओवाळावी.

व आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी

ठेवलेल्या चांगल्या संस्कृतीचा खजिना

जतन करून ठेवावा हिच अपेक्षा ।।

 

 #१. आली आली दिवाळी


दिन दिन दिवाळी

गाय म्हशी ओवाळी

गाई कुणाच्या, लक्ष्मणाच्या

चोळूनमोळून केल्या गुंजा।।


गाईख्याच्या काठीला खुळखूळ गुंजा

गाय ईली डुबा झाला

घरच्या धन्याला हरिक झाला

हरका हरका दळे गहू।।


आमच्या गावचे पंडीत पवू

पंडीताचे उभे खिळे

....... बोच्यात ठोकले खिळे

खिळे वाजे करा करा।।


...... पादे परा परा

परच्या हाती परसकांदा

नरच्या हाती नरस कांदा

देग म्हतारे पळीभर तेल।।


तेल नाही तर चावडीत चल

चावडीत होती निळी घोडी

लाथा मारी फडोफडी

तेल घेऊ घडोघडी 

हंडुरले ।।

-------------------------------

#२ ओवाळू दिवाळी...आनंदाची


गायख्या दादा झोपाटा उघड

झोपाटा उघड

गाई जाऊदे वरल्या रानी

वरल्या रानी।।


वरला रान कुळंबटाचा,कुळंबटाचा

गाई येऊ दे नदीच्या कडा 

नदीच्या कडा

नदीचे पाणी झिळमिळे झिळमिळे।।


त्याला लागला सोग्या मोर

सोग्या मोर

सोग्या मोराचे लांब लांब पख

एक पख आखडला आखडला।।


त्याला लावला गंभिऱ्या नाडा

गंभिऱ्या नाडा

पळत्या पाण्यातून हकितो गाडा

हकितो गाडा।।


गाडा पळे गाढवाटांना

सुशिट पळे अडवाटांना

अडवाटांना

अडवाटाची तोडली काठी

तोडली काठी।।


काठी गुतली शेवळाला

शेवळाला म्हातारा म्हातारी

देवळाला।

---------------------------------

#३ मोरी गाय ईली गेणुबा....


मोरी गाय ईली गेणुबा

मोरी गाय ईली।

मोरीला झालाय पाऱ्या गेणुबा

मोरीला झालाय पाऱ्या।।


पाऱ्याच्या गळयात गेठा गेणुबा

पाऱ्याच्या गळयात गेठा

गेठयाला मोडलाय काटा गेणुबा

गेठयाला मोडलाय काटा।।


काटया कुटयाच्या वनी गेणुबा

काटया कुटयाच्या वनी

गाई परसल्या पाणी गेणुबा

गाई परसल्या पाणी।।


पाणी पितोळो मासा गेणुबा

पाणी पितोळो मासा

गाई लागल्या देसा गेणुबा

गाई लागल्या देसा।।


देशादेशाचे येळू गेणुबा

देशादेशाचे येळू

गाईनी मांडले खेळू गेणुबा

गाईंनी मांडले खेळू।।


खेळू फुटतो पांडया गेणुबा

खेळू फुटतो पांडया

बैल डरतो नांदया गेणुबा

बैल डरतो नांदया।।


नांदया बैलाची येसन गेणुबा

नांदया बैलाची येसन

निळया घोडीवर बस गेणुबा 

निळया घोडीवर बस।।


निळया घोडीचा रवा गेणुबा 

निळया घोडीचा रवा

कोण्या शिळीचा पवा गेणुबा

कोण्या शिळीचा पवा।।


पव्या पाव्याच्या चिपळया 

आम्ही रशीम गोंडयाच्या मावळया

पाभारीला चार नळया

मोघाडाला तीन नळया।।


हानील बुक्की फोडील चाडा

नरशा आला पिऊन गेला

लाथ बुक्की देऊन गेला 

हंडुरले......

–-----------------------------------

#४ माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे #


माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे

तुझ्या मळयातुन जाई रे

जाईगुन जाई तिरगुन जाई

सर्वात लहान काई गोपाळा

उत्तर दे मग जाई रे।।


माझ्या मळयातली शिंगी गोपाळा रे

तुझ्या मळयातली शिंगी रे

शिंगून शिंगी तिरगुन शिंगी

सर्वात लहान मुंगी गोपाळा

ऐकून घे मग जाई रे


माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे

तुझ्या मळयातुन जाई रे 

जाईगुन जाई तिरगुन जाई

माळानं पळतयं काई गोपाळा

ऊत्तर दे मग जाई रे।।


माझ्या औताचा येला गोपाळा रे

तुझ्या औताचा येला रे येलगुन येला 

तिरगुन येला माळानं पळतोय कोल्हा

गोपाळा ऐकून घे मग जाई रे।।


माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे

तुझ्या मळयातुन जाई रे

जाईगुन जाई तिरगुन जाई 

दोन सडाचे काई गोपाळा 

ऊतर दे मग जाई रे।।


माझ्या मळयातली केळी गोपाळा रे

तुझ्या मळयातली केळी रे 

केळगुन केळी तिरगुन केळी

दोन सडांची शेळी गोपाळा ऐकून 

घे मग जाई रे


----------------------------


#५ "नाग्या बैलाचे कापले कान"


नाग्या बैलाचे कापलं कान,

तिथं तुकाराम खातो पान,पान

त्या पानाला कात ना चुना,चुना

सोम्या देतो खुणा,खुणा।।


खुणा वाल्याचा कात ओला,ओला

अंबु ताक प्याला,प्याला

ताक पेऊन गार झाला

येण्या देण्यानं लावल्या दशी,दशी।।


वाळया लंगडयानं घेतल्या म्हशी,म्हशी

त्या म्हशींची शिंगे खाली,खाली

दामु चाकरी घाली,घाली

त्या चाकरीत पडला रेडा, रेडा।।


 भावडयांनं घेतलाय घोडा,घोडा

त्या घोडयावर कोण कोण बसं,बस

भावडयान त्याची बायको बस,बस।।


Wednesday, 11 November 2020

भागोजी नाईक



आदिवासी म्हणजे भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतीची धगधगती मशाल, भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी सर्वाधिक रक्त सांडले ते आदिवासी क्रांतिकारक व विरांगणांचे, पण देशाला स्वातंत्र मिळताच या क्रांतिकारकांचा इतिहासच संपतो.
    असाच खोट्या इतिहासकारांनी दृष्टीपलिकडे ठेवलेला 
    आदिवासी योद्धा विर भागोजी नाईक(पवार).सिन्नर तालुक्यातील २५ किमी अंतरावर असलेल्या नांदुरशिंगोटे गावी त्यांचा जन्म स्वातंत्रपुर्व काळात झाला.ब्रिटीशांनी संपुर्ण देश काबिज केला होता .भारतातील सर्व राजे,महाराजे इग्रजांचे अंकीत-गुलाम बणुन आपला राजकारभार ब्रिटीशांच्या हुकूमाप्रमाने चालवत होते, पण याच देशात असा एक समाज होता, जंगलात राहणारा, कंदमुळे खाणारा , निसर्गाला देव माणुन पुजणारा आदिवासी,त्याने कधी इग्रजांची गुलामी पत्करली नाही आणि शेवट पर्यत लढत राहिला.आदिवासी बंडकर्यांच्या देशात अनेक टोळ्या होत्या आणि त्या ब्रिटीश सरकारला आवाहन देत होत्या .आदिवासी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी इग्रजांनी आदिवासींचीच तरुण पोर सैन्यात भरती करायला सुरुवात केली .भागोजीला देखिल सैन्यात भरती करण्यात आले, पण ब्रिटीश अधिकारी भागोजीकडे सतत संशयाने बघत, आदिवासी बंडकर्यांना मदत करत असल्याचे आरोप होत, ब्रिटीशांसोेबत प्रामाणिक राहूण आपण आपल्याच देशबांधवांवर शस्र उचलत होतो याची भागोजीच्या मनात खंत होतीच, शेवटी देशाला स्वतंत्र्य मिळावे ही प्रत्येक देशवासियाचे ध्येय होते, तेच ध्येय उरी बाळगून भागोजी नाईकांनी बंडात उडी घेतली, 
       ब्रिटीश सरकारणे नुकतेच नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे येथे सळो की पळो करुन सोडणार्या राघोजीचे बंड १८४८ मध्ये मोडून काडले होते, 
    त्याचवेळी इंग्रजांच्या पलटनीमध्ये तयार झालेला भागोजी बडकर्यात सामिल झाला, ५० भिल्ल व महादेव कोळी बंडकर्याना सोबत घेवून पुन्हा आदिवासी बंडकर्यांचा दबदबा नाशिक, नगर जिल्हात कायम ठेवला, नाशिक, पुणे, नगरचे रस्ते भागोजीने त्याब्यात घेतले, इंग्रजांचे दळणवळणाचे मार्ग आडवून त्यांना हैराण केले, नाशिक, पेठ, हरसुल येथे झालेल्या चकमकीत इंग्रजांना नमवले,
        भागोजीच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी कॅ.हेन्री ला भागोजीवर सैन्य घेवून पाठवले, त्यावेळी भागोजी नाईक चासखिंडीत होता तेथेच इंग्रज व भागोजी नाईक यांच्यात लढाई झाली, त्यात भागोजीला मारण्यास आलेला हेन्री भागोजीच्या बंदुकीच्या गोळीचा शिकार झाला,  
   ही बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली, आदिवासी बंडकर्याचा उत्साह वाढत होता, पण भागोजीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज फितुरी, इनाम यासारख्या  सर्व चाली खेळू लागले . त्यात त्यांना यश देखिल आले, १८५८ चा उठाव इंग्रजांनी नुकताच मोडून काढला होता.भागोजीचेपण आता वय  ५७-५८ झाले होते, भाऊ महिपत व मुलगा बंडात कामी आला होता, तरी देखिल नाईकाचा लढा चालुच होता, 
      खबर्याने दिलेली बातमी खरी होती, भागोजीला व त्याच्या साथीदारांना गोदावरी तिरी सांगवीच्या बेटावर आफाट इंग्रज सैन्यान रातोरात घेरल, दिवस उजाडताच दोन्ही बाजूने बंदुकीच्या फैरी सुरु झाल्या, भागोजीचा एकएक साथीदार खाली कोसळत होता .
     सकाळी उगवलेला सुर्य मावळतीला चाला होता, 
    पण निकराने झुंजणार्या भागोजीचा पराक्रम पाहत होता,
   एका गोळीवर भागोजीचपण नाव लिहिलं होतं, 
   तिनं तिचा वेध साधला होता.
 बेटावरुन होणारा गोळीबार आता शांत झाला होता, 
   आदिवासींचा वाघ गोदातिरी धारातिर्थी पडला होता .
       तो दिवस होता ११नोव्हेंबर१८५९
अशा पराक्रमी आदिवासी विरास विनम्र अभिवादन.....

Tuesday, 13 October 2020

भामगिरी / भामचंद्र / भांबगिरि

#भामगिरी / #भांबगिरी / #भामचंद्र #डोंगर

                भामगिरी डोंगररांग चाकण पासून २० किमी अंतरावर असून पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.

             भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाके  आहेत. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्‍या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे.  मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात.  गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक  पायवाट खालच्या बाजूला जाते. थोडासा उजव्या बाजूला गेल्यावर ती वाट डोंगर च्या माथ्यावर जाते .
वरून भीमाशंकर,भंडारा, घोरडेश्वर, नजरेस पडतात 

तुकाराम महाराजांनी १५ दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले. त्या काळात सर्प, विंचू, वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडल नाही, आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.

पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !

भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!


Monday, 21 September 2020

भंडारा डोंगर

भंडारा डोंगरावरील बौद्ध गुंफा

Friday, 18 September 2020

खाज्या नाईक

खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हातातून एक लुटारू मारला गेला व त्या कारणासाठी त्यांच्यावर खटला भरून १० वर्षे सजा देण्यात आली.१८५५ ला शिक्षा भोगून आल्यावर आपल्याला नोकरीत परत घ्यावे आशी विनंती त्यांनी सरकारला केली,परंतु ती बाद झाली पण १८५७ साली वातावरण तापू लागले तसे ब्रिटिशांना खाज्या नाईकांची गरज भासू लागली परंतु आता ते दुसऱ्याच प्रेरणेने भारले गेले होते. ते दिल्लीच्या बादशहाच्या संपर्कात होते व सूचना मिळताच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या सोबतीला भीमा नाईक, मेवाश्या नाईक होते, त्यांनी ७००-८०० भिल्लांना जमा करून गावच्या गावे लुटायला सुरुवात केली व ब्रिटिशांना युद्धाचे आवाहन केले तेव्हा त्यांना हनुमंत राव भिल्ल येऊन मिळाला. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दहशत निर्माण करून सेंधवा घाटावर काब्ज्जा करून ब्रिटीशांच्या एवजी स्वतः कर वसूल करण्यास सुरुवात केली. होळकरांच्या राज्यातून ब्रिटिशांनी गोळा केलेली खंडणी मुंबईला जात होती ती खाज्या नाईकांनी लुटली ती जवळ जवळ ७००००० रुपये होती, व त्याचे रक्षण ३०० सैनिक करीत होते पण त्यांनी खाज्यांना किंवा त्यांच्या कोणत्याही भिल्ल सैनिकाला विरोध केला नाही. एवढा मोठा धक्का ब्रिटिशांना कोणीही दिला नव्हता. ब्रिटीशांचे धाबेच दणाणले व जर खाज्या नाईकांचा बंदोबस्त केला नाही तर सत्ता टिकणार नाही याची त्यांना खात्री पटली. खाज्या नाईकांच्या दलात आता महादेव नाईक व दौलत नाईक हि येऊन मिळाले, अक्राणी महाल भागात ब्रिटिशांच्या विरुद्दः उभे राहिलेले काळूबाबा नाईक ही आता खाज्यांना येऊन मिळाले त्याच प्रमाणे होळकरांच्या धार संस्थानातील रोहिले, मकरानी व अरब सैन्य ही आता खाज्यांना येऊन मिळाले. आता भिल्ल सेना चोहोबाजूने ब्रिटीशांच्या विरोधात उठली होती, "सुलतानपुरच्या" भिल्ल सेनेने " सारंगखेडा " गावावर हल्ला चढविला व ब्रिटिशांना सडो कि पडो करून सोडले. मंदाने गावाचे रुमाल्या नाईक ही ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करत होते. आता ब्रिटिशांनी उठाव दडपण्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरु केलेले होते. जिल्ह्यात सैनिकांच्या पलटनी वाढवल्या गेल्या त्याच प्रमाणे अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नेमनुकीही करण्यात आल्या. व त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले. एवढेच नाही तर भिल्लांशी लढण्या साठी भिल्लाचेच बांधव असलेले महदेव कोळी जमातीची पलटण तयार करण्यात आली होती. आता भिल्लांना जागोजागी घेराव घातला जात होता व त्यांची ताकद कमी करण्यात येत होती. अश्यातच मेजर ईव्हान्स ला खाज्या व त्याचे ३००० साथीदार हे बडवानी च्या जवळ आम्बापानीच्या जंगलात आश्रयाला असल्याची खबर लागली व त्यांनी भिल्लांना घेराव टाकला. पण जर शरण येतील ते भिल्ल कसले त्यांनी जवळ असलेल्या दगडांच्या व भिल्खीच्या आधारे व काही बंदुकांच्या आधारे लढण्यास सुरुवात केली, परंतु ब्रीतीशांच्या तैनाती फौजा व अत्याधुनिक बंदुकांपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते तरीही त्यांनी मोठ्या हिम्मतीने लढाई करून ब्रिटीशांचे दोन अधिकारी व १६ सैनिक मारले. भिल्लांची खूप हानी झाली. ४६० स्त्री व पुरुषांना कैद करण्यात आले. खाज्या नाईक, मेवाश्या नाईक, भाऊ रावल यांच्या बायकांना कैद झाली व खाज्या नाईकांचा मुलगा " पोलाद्सिंग" हा 'शहीद' झाला. पकडलेल्या कैद्यान्पाकी ५५ कैद्यांना जागेवरच गोळ्या घालून मारण्यात आले. आपल्या असंख्य साथीदारांची कत्तल, कुटुंबाची वाताहत पाहूनही खाज्या खचले नव्हते. ते सतत ब्रिटीशांसी लढत राहिले, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले व सशर्त माफी मागावी व धुळ्याच्या कल्लेक्टरास शरण यावे म्हणून फर्मान काढले. परंतु त्यांनी सशर्त माफी मागण्यास नकार देऊन संपूर्ण माफी जर देत असाल तर आम्ही शरण येऊ असे उलट उत्तर दिले. हा ब्रिटीशांचा अपमान होता त्यामुळे बोलणे फिसकटले व त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाज्या नाईकांनी २६/१०/१८५७ ला शिरपूर लुटले व ब्रिटीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बरोबर फक्त १५० भिल्ल होते. १७/११/१८५७ साली परत खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी ७००००० चा ब्रिटीशांचा खजिना लुटला. दिनांक ११ एप्रिल १८५८ रोजी खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, काळूबाबा नाईक याच्यासह १५०० भिल्ल सैनिकांना मेजर ईव्हान्सने आम्बापानीच्या जंगलात घेराव घालून हल्ला केला त्याचा बरोबर ब्रिटीशांची मोठी तैनाती फौज व अत्याधुनिक शास्त्रे होती.युद्धात ६५ लोक मारले गेले. खाज्या नैकांसाहित ५७ लोकांना ड्रमच्या आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या व त्यांचे शीर कापून सेन्धाव्याच्या किल्ल्याबाहेर लटकावण्यात आले कि पुन्हा जर कोणी उठाव केला तर त्याची हाल असे होतील म्हणून व ४० स्त्रीयांना अटक झाली ही लढाई १८५७ च्या समरातील " आम्बापानीची लढाई " म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या लढाईचा उल्लेख कोणत्याही शैक्षणिक पुस्तकात जाणीव पूर्वक टाळल्याचे लक्षात येते.